मुक्तपीठ टीम
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांच्या जागी काँग्रेस नेते रवनीत सिंह बिट्टू यांची लोकसभेत पक्षनेता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बंगालमधील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी पुढील दोन महिने निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असणार आहेत, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे पक्षांकडून सांगण्यात आले आहे.
काँग्रेस नेते रवनीत सिंह बिट्टू यांच्याबद्दल
- ४५ वर्षीय बिट्टू हे सलग तीन वेळा लोकसभा निवडणुक जिंकले आहेत.
- ते २००९मध्ये पहिल्यांदा आनंदपुर साहिबचे खासदार झाले.
- त्यानंतर २०१४ आणि २०१९मध्ये लुधियानामधून लोकसभेत निवडून आले.
- बिट्टू हे पंजाबचे माजी मुख्यमंत्री बेअंत सिंह यांचे नातू आहेत.
- यापूर्वी ऑगस्टमध्ये बिट्टू यांना लोकसभेत कॉंग्रेसचे व्हीप म्हणून नियुक्त करण्यात आली होती.
- पंजाबचे युवा नेते बिट्टू हे देखील पंजाब युवा कॉंग्रेसमधील लोकशाही निवडणुकांमधून निवडून आलेले पहिले नेते आहेत.
दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात रवनीत सिहं बिट्टू सातत्याने सक्रिय होते. सिंघू सीमेवर सुरू असलेल्या आंदोलना दरम्यान त्यांच्यावर हल्लासुद्धा झाला होता. तसेच याआधी २००९मध्ये बिट्टू यांनी पंजाब यूथ काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून व्यसनमुक्तीसाठी मोहीम सुरू केली होती. तसेच २०११ मध्ये राज्यात ड्रग्ज प्रिवेंशन बोर्डाची स्थापना करण्यासाठी त्यांनी उपोषणही केले होते.