मुक्तपीठ टीम
राज्यस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या काँग्रेस अध्यक्ष पदाच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार असल्याची बातमी समोर आली आहे. लोकसभा सदस्य शशी थरूर यांनी आधीच निवडणूक लढवण्याचा आपला निर्णय जाहीर केला असून ३० सप्टेंबर रोजी अध्यक्षपदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. गेहलोत यांच्यावर हायकमांडच्या नाराजीमुळे काँग्रेस अध्यक्षपदासाठी आता दिग्विजय विरुद्ध थरूर लढतीची शक्यता दिसत आहे.
काँग्रेस अध्यक्षपदासाठी दिग्विजय विरुद्ध थरूर यांच्यात लढत!!
- राजस्थानमधील राजकीय पेचप्रसंगामुळे मुख्यमंत्री गेहलोत यांच्या उमेदवारी अर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असतानाच मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह हे उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात.
- लोकसभा सदस्य शशी थरूर यांनी आधीच निवडणूक लढवण्याचा आपला निर्णय जाहीर केला आहे.
- येत्या ३० सप्टेंबर रोजी ते अध्यक्षपदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील.
- गेहलोत यांच्यावर हायकमांडच्या नाराजीमुळे काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक आता दिग्विजय विरुद्ध थरूर यांच्याकडे जाणार असल्याचे दिसत आहे.
- ७५ वर्षीय माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह हे देखील अशोक गेहलोत यांच्यासारखे गांधी घराण्याचे दीर्घकाळ निष्ठावंत आहेत.
- अशा स्थितीत गांधी परिवार गेहलोत यांचा पाठिंबा काढून दिग्विजय सिंह यांना मैदानात उतरवू शकतो.
आज अध्यक्षपदाच्या रिंगणात गेहलोत की दिग्विजय सिंह उतरणार हे ठरणार!
- राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत बुधवारी रात्री दिल्लीला रवाना झाले आहेत.
- पक्षाध्यक्षपदाच्या शर्यतीत राजस्थानचे मुख्यमंत्री यांचे नाव जाहीर होते.
- मात्र राजस्थानमध्ये त्यांच्या निष्ठावंतांनी बंडखोरी केली, त्यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाराज झाले आहेत.
- गेहलोत हे गुरुवारी सोनिया गांधी यांची भेट घेण्याची शक्यता आहे.
- ही बैठकच पुढचा मार्ग ठरवू शकते.
- सोनिया आणि गेहलोत यांच्या भेटीनंतर गेहलोत काँग्रेस अध्यक्षपदाच्या रिंगणात उतरणार की दिग्विजय सिंह हे ठरणार!