Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आता ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही!: नाना पटोले

प्रदेश काँग्रेस ओबीसी पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा संपन्न

November 25, 2021
in घडलं-बिघडलं
0
nana patolee on obc

मुक्तपीठ टीम

इतर मागास वर्ग (ओबीसी) लोकसंख्येने मोठा आहे परंतु या समाज घटकाला योग्य न्याय मिळत नाही. संविधानाने जे हक्क दिलेले आहेत ते समाजाला मिळाले पाहिजेत त्यासाठी संघर्ष करू. आपल्या न्याय हक्क व मागण्यासांठी काँग्रेस पक्ष सदैव आपल्याबरोबर राहिल, आता ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

nana patolee on obc

टिळक भवन येथे प्रदेश काँग्रेस ओबीसी विभागाच्या  नवनिवयुक्त पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, प्रदेश उपाध्यक्ष व माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव व सहप्रभारी सोनल पटेल, सरचिटणीस देवानंद पवार, सरचिटणीस प्रमोद मोरे दिप्ती चवधरी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

nana patolee on obc

यावेळी पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले की, ओबीसी समाजाने २०१४ व २०१९ च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मोठ्या प्रमाणात मतदान करुन केंद्रात सत्ता दिली पण भाजपाने ओबीसी समाजाच्या कल्याणासाठी काहीही केले नाही. भाजपाने ओबीसी समाजाचा फक्त मतांसाठी वापर केला. ओबीसी समाज मागणारा नाही परंतु संविधानाने दिलेले हक्क समाजाला मिळाले पाहिजेत आणि हे अधिकार मिळत नाहीत तोपर्यंत संघर्ष करत राहु. ही लढाई मोठ्या शिताफिने लढावी लागणार आहे. ओबीसींच्या शिष्यवृत्तीसाठी १९९९ साली आपण आमदार असताना आग्रही मागणी करून त्याचा पाठपुरावा केला आणि तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी ओबीसी समाजातील मुलांना दहावीपर्यंत शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला असे पटोले यांनी सांगितले.  भानुदास माळी यांची ओबीसी विभागाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यापासून ते राज्यात संघटन वाढीसाठी प्रयत्न करत आहेत. हे संघटन उभे करुन काँग्रेस पक्षाची ताकद कशी वाढले यासाठी काम करा, असे आवाहनही पटोले यांनी केले.     

nana patolee on obc

माजी मंत्री सुनिल देशमुख व ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांचीही यावेळी भाषणे झाली.


Tags: bhanudas malinana patoleOBCsunil deshmukhVilasrao Deshmukhओबीसीनाना पटोलेभानुदास माळीविलासराव देशमुखसुनिल देशमुख
Previous Post

पाणी पुरवठा योजनांची कामे कालबद्ध कार्यक्रम आखून पूर्ण करावीत

Next Post

राज्यातील १०५ नगरपंचायतींसाठी २१ डिसेंबरला मतदान

Next Post
maharashtra state election commission

राज्यातील १०५ नगरपंचायतींसाठी २१ डिसेंबरला मतदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!