मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवर काँग्रेसचे अनेक आमदार नाराज आहेत. त्यांनी यासाठी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे भेटीची वेळही मागितली आहे. मंत्री आपले ऐकत नसल्याची या आमदारांची तक्रार आहे. या आमदारांच्या समस्यांचे निराकारण करण्यासाठी दर तीन आमदारांमागे एक मंत्री अशी समन्वयाची जबाबदारी दिल्याचं नुकतंच त्यांना सांगण्यात आलं. असं कुणी समन्वय मंत्री असल्याचं सत्तेच्या या अडीच वर्षात कळलंच नाही, असं आमदारांनी स्पष्टपणे सांगितलं आहे.
आमदारांची सर्वाधिक नाराजी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावर आहे. ग्रामीण भागातील विजेची स्थिती अत्यंत बिकट असल्याचे सांगत त्यामुळे निवडणुकीत फटका बसू शकतो, असे म्हणाले.
महाराष्ट्रातील किमान २५ काँग्रेस आमदारांनी महाविकास आघाडी सरकारविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसच्या मंत्र्यांविरोधात तक्रार करण्यासाठी त्यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची भेटीची वेळ मागितली आहे. आपल्याच पक्षाचे मंत्री त्यांचा चिंतेचे निरसरण करत नसल्याचा आरोप त्यांनी केला. आमदारांनी एका पत्रात सोनिया गांधींना यात हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.
आम्हाला समन्वय मंत्रीही आहे?
पक्षात समन्वयाचा अभाव असल्याचे काँग्रेसचे आमदार उद्विग्नतेने सांगतात. त्यांना गेल्या आठवड्यातच कळले की प्रत्येक काँग्रेस मंत्र्यावर तीन आमदारांच्या समन्वयाची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रत्येक काँग्रेस मंत्र्याने त्या तीन काँग्रेस आमदारांच्या समस्यांचे योग्य निराकरण करणे अपेक्षित आहे. पण हे आमदारांना आजवर कुणी सांगितलेच नव्हते. काँग्रेसचे प्रभारी एच के पाटील यांनी तसं बैठकीत सांगितलं तेव्हा बहुसंख्य आमदारांना असंही ठ