Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

काँग्रेसचा देशात अध्यक्ष ठरत नसला, तरी परदेशात अध्यक्षांची फौज!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
rahul and soniya gandhi

मुक्तपीठ टीम

देशातील भाजपा सरकारविरोधात काँग्रेस रोज वेगवेगळे मुद्दे घेऊन आक्रमक होत असते. महाराष्ट्रासारख्या राज्यांमध्ये तर महागाईच्या मुद्द्यावर काँग्रेस मोदी सरकारवर रस्त्यावरही उतरत आहे. पण त्याचवेळी राष्ट्रीय पातळीवर मात्र काँग्रेसचे बराच काळ अध्यक्षपद रिकामे आहे. राहुल गांधी तयार नसल्यानं रिकाम्या अध्यक्षपदासह काँग्रेस देशात कार्यरत असताना परदेशात मात्र काँग्रेसने देशांनुसार अध्यक्ष नेमले आहेत. ते शक्य झालं आहे, टेक्नोक्रॅट नेते सॅम पित्रोदा यांच्यामुळे!

परदेशी नेमणुकांमागे टेक्नोक्रॅट नेत्यांचं टेक्निक!

  • टेक्नोक्रॅट सॅम पित्रोदाकडे ओव्हरसीज कॉंग्रेसची जबाबदारी आहे. त्यांनी या आठवड्यात नवीन नेमणुका जाहीर केल्या.
  • युरोपातील २३ देशांमध्ये कॉंग्रेसच्या शाखा आहेत.
  • त्यातील ब्रिटनमधील संघटना सर्वात मजबूत आहे.
  • पित्रोदा यांनी केलेल्या बहुतेक नेमणुका व्यावसायिक किंवा बौद्धिक क्षेत्रातील आहेत.

परदेशात काँग्रेसच्या अध्यक्षपदी कोण कोण?

  • नॉर्वेमध्ये ‘इंडियन ओव्हरसीज कॉंग्रेस’ (आयओसी) चे अध्यक्ष म्हणून गीरिसोबरसिंग गिल यांना पक्षाने नियुक्त केले आहे.
  • चक्र बीयरच्या वेबसाइटनुसार २००६ साली लाँच झालेली त्यांची बिअर आंतरराष्ट्रीय बाजारातील “पहिली पंजाबी ब्रँड” आहे.
  • गिल यांनी सांगितले की त्याचे वडील युरोपमधील आयओसीचे संस्थापक होते आणि आयुष्यभर ते कॉंग्रेसमध्ये राहिले.
  • कॉंग्रेसने फिनलँडसाठी ३५ वर्षीय वैज्ञानिक कोमल कुमार यांची निवड केली आहे.
  • त्या ब्लड कॅन्सरच्या क्षेत्रात काम करतात.
  • त्याशिवाय कॉंग्रेसने इटलीमध्ये दिलबाग चन्ना, स्वित्झर्लंडमधील जॉय कोचट्टू, स्वॉनमध्ये सोनिया हेलडस्टॅड, ऑस्ट्रियामधील सुनील कोरा, बेल्जियममधील सुखिवन प्रीत सिंग, हॉलंडमधील हरपिंदरसिंग घाग आणि पोलंडमध्ये अमरजितसिंग यांची नेमणूक केली आहे.

देशातील कॉंग्रेसचे अध्यक्षपद मात्र रिकामेच!

  • कॉंग्रेसला परदेशात अध्यक्षपदासाठी माणसं सापडले असतील, परंतु अद्याप देशात काँग्रेसला अध्यक्ष नाही.
  • राहुल यांनी वारंवार नकार दिला आहे, तर पक्षाच्या बहुतेक नेत्यांना गांधी कुटुंबाचेच नेतृत्व पाहिजे आहे.
  • अध्यक्षपदाची निवडणूक वेळोवेळी तहकूब करण्यात आली आहे.
  • कोरोनाचे कारण देत निवडणुका वर्षातून तीनदा तहकूब करण्यात आल्या.
  • सध्या सोनिया गांधी अंतरिम अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Tags: Congressrahul gandhiSonia Gandhiओव्हरसीज कॉंग्रेसकाँग्रेसटेक्नोक्रॅट सॅम पित्रोदाराहुल गांधीसोनिया गांधी
Previous Post

ऑनलाइन व्हिडीओ गेम्सवर आता मिडनाइट पेट्रोल फीचरची नजर!

Next Post

मराठा समाजाला दिलासा, ESBC नियुक्त्या कायम, तर SEBC वयोमर्यादा मागासवर्गीयांप्रमाणेच!

Next Post
maratha community

मराठा समाजाला दिलासा, ESBC नियुक्त्या कायम, तर SEBC वयोमर्यादा मागासवर्गीयांप्रमाणेच!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!