मुक्तपीठ टीम
काँग्रेसने आता कार्यक्रमांच्या माध्यमातून थेट लोकांपर्यंत जाण्याचं पाऊल उचललं आहे. महागाईविरोधी आक्रमक आंदोलनानंतर आता काँग्रेस नेते भारत जोडा यात्रा काढणार आहेत. तब्बल ३ हजार ७०० किमी अंतराचा टप्पा पार केला जाणार आहे. या यात्रेत काँग्रेस नेते राहुल गांधींसह कन्हैया कुमार, प्रवीण खेरांसह १००पेक्षा जास्त नेते सहभागी होणार आहेत.
काँग्रेसचे नेते भारत यात्री बनणार!
- काँग्रेसच्या ७ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या भारत ‘भारत जोडो यात्रेसाठी’ नेत्यांच्या नावांची यादी तयार करण्यात आली आहे.
- काँग्रेस युवा नेते कन्हैया कुमार, पवन खेरा आणि पंजाबचे माजी मंत्री विजय इंदर सिंगला यांचेही नाव या यादीत आहे.
- या यादीत युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष केशवचंद्र यादव आणि उत्तराखंड काँग्रेसचे संपर्क विभाग सचिव वैभव वालिया यांच्याशिवाय अनेक महिला कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
- ‘भारत जोडो’ यात्रेत राहुल गांधींसोबत १०० हून अधिक नेते असणार आहेत. या नेत्यांना ‘भारत यात्री’ असे नाव देण्यात आले आहे.
जवळपास सर्वच विभागांचे आणि राज्यांचे प्रतिनिधित्व करत असलेले नेते यात सहभागी असतील.
राहुल गांधीसह यात्रेत सहभागी भारतयात्री नेते…
- काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खेडा आणि कन्हैया कुमार यांच्याशिवाय पक्षाचे संपर्क विभागाचे सचिव वैभव वालिया, पंजाब सरकारचे माजी मंत्री विजय इंदर सिंगला, भारतीय युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष केशवचंद यादव, माजी सरचिटणीस सीताराम लांबा आणि उत्तराखंड महिला काँग्रेसच्या अध्यक्षा ज्योती रौतेला यांचा समावेश आहे.
- यासोबतच युवक काँग्रेसचे राष्ट्रीय मीडिया प्रमुख राहुल राव, सरचिटणीस संतोष कोलकोंडा आणि उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटीचे नेते शाहनवाज आलम यांचा ‘भारत यात्री’ यादीत समावेश करण्यात आला आहे.