Saturday, May 10, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

मुंबईतील आरे जंगल वाचवण्यासाठी ठाण्यात काँग्रेसचं आंदोलन का? समजून घ्या कारणं…

August 21, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Congress Agitation

मुक्तपीठ टीम

आरे जंगलातच कार शेड लादण्याच्या शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्णयाविरोधात काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. काँग्रेस पर्यावरण विभागाचे प्रदेशाध्यक्ष समीर सुभाष वर्तक यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातच धडक दिली. खरंतर या पर्यावरणप्रेमींना त्यांच्या घरासमोरच संताप व्यक्त करायचा होता, पण पोलिसांनी त्यांना अडवलं. तरीही जंगलाचा बळी घेऊन कारशेड नको, हा पर्यावरणप्रेमींचा आवाज मात्र ठाण्यात घुमवण्यात त्यांना यश आलं.

मुंबईकरांची ऑक्सिजनची गरज भागवणाऱ्या आरे जंगलाचा बळी घेतल्यामुळे मुंबईचं भविष्य काळकुट्ट होईल, असा आरोप करत काँग्रेसच्या नेतृत्वाखाली पर्यावरणप्रेमींनी ठाणे दणाणून सोडलं.मुंबईची फुफ्फुसे असलेले आरेचे जंगल हे भविष्यातही जंगलच रहावे आणि आरेमधील मेट्रो कारशेड रद्द करावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागातर्फे शांततेत निषेध धरणे आंदोलन करण्याचे नियोजन होते. पण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागाचे प्रदेशाध्यक्ष समीर सुभाष वर्तक यांच्या नेतृत्वाखाली पर्यावरणप्रेमी निघताच पोलिसांनी त्यांना रोखलं.

आरे जंगल वाचवण्यासाठी ठाण्यात आंदोलन का?

  • मुंबई शहराच्या मध्यभागी मुंबईकरांना ऑक्सीजनचा पुरवठा करणारे पर्यावरणाचे महत्व जपणारे, जैवविविधतेने नटलेले आरचे जंगल आहे.
  • जगात नैसर्गिक जंगल असलेले मुंबई हे एकमेव शहर आहे. ऑक्टोबर २०१९ मध्ये मुंबई मेट्रोच्या कारशेडसाठी आरे जंगलाची निवड करण्यात आली.
  • दिनांक ४ ऑक्टोबर २०१९ रोजी पर्यावरणप्रेमींच्या आंदोलनानंतरही रात्रीच्या अंधारात हज़ारो वृक्षांची अमानुषपणे कत्तल करण्यात आली.
  • वृक्ष वाचविण्यासाठी आंदोलन करणाऱ्यांना तुरुंगात डांबण्यात आले.
  • या आंदोलनाची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेण्यात आली होती.
  • त्यावेळी एकनाथ शिंदे हे महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकास मंत्री होते, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कारशेडची जागा बदलून आरे हे जंगल म्हणून घोषित केले होते.
  • पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होताच त्यांनी आरे जंगलातील मेट्रोच्या कारशेडची जागा बदलली जाणार नाही ही घोषणा केली.
  • या घोषणेमुळे मुंबई व महाराष्ट्रातील समस्त जनता व पर्यावरणप्रेमींमध्ये तीव्र नाराज आहे.
  • त्यामुळे मुख्यमंत्र्यांचं गृहशहर असणाऱ्या ठाणे शहरात आंदोलन करण्यात आलं.

पर्यावरण व हवामान ढासळत असताना अश्या तुघलकी निर्णयाच्या विरोधात आणि आरेचे जंगल वाचावे म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी आंदोलन करून निषेध व्यक्त केला गेला. काँग्रेसच्या ‘आरे वाचवा, पर्यावरण वाचवा’ हे आंदोलन पुढेही सुरु राहणार आहे, त्यात पुढेही सहभागी व्हावे होऊन आरेचे जंगल वाचवण्यासाठी हातभार लावावा असे आवाहनही समीर वर्तक यांनी केले आहे.


Tags: Aarey forestCongressmumbaiSave Aareyआरे जंगलकाँग्रेसमुंबई
Previous Post

आठ मंत्रालयांनी दलितांसाठी आतापर्यंत खर्च न केलेले ९५० कोटी आता सामाजिक न्याय मंत्रालयाला! निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारचे दलित कार्ड!!

Next Post

पालघरमधील झडपोलीच्या जिजाऊ कोकण वर्षा मॅरेथॉनमध्ये दिनकर गुलाब महालेने पटकावला पहिला क्रमांक!

Next Post
dinkar mahale won jijau varsha marathon 2022, mp dr shrikant shinde apreciates jijau & nilesh smabare social work

पालघरमधील झडपोलीच्या जिजाऊ कोकण वर्षा मॅरेथॉनमध्ये दिनकर गुलाब महालेने पटकावला पहिला क्रमांक!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!