मुक्तपीठ टीम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात कोरोना पसरवण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेस जबाबदार असल्याचे सांगत गंभीर आरोप केला होता. त्यामुळेच पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात आता राज्यभरात काँग्रेस आक्रमक झाली आहे. नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसबाबत केलेल्या वक्तव्यावर माफी मागितली पाहिजे यासाठी बुधवारी राज्यभरातील भाजपाच्या कार्यालयांसमोर काँग्रेस आंदोलन करत आहे.
पंतप्रधान मोदींनी माफी मागितल्याशिवाय आपण आंदोलन मागे घेणार नाही- पटोले
- मुंबईमध्ये मंत्रालयासमोर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे.
- पंतप्रधान मोदींनी माफी मागितल्याशिवाय आपण आंदोलन मागे घेणार नसल्याचंही पटोले यांनी सांगितलं आहे.
- तसंच राज्यभरातल्या भाजपा कार्यालयासमोर काँग्रेस आंदोलन करणार असल्याचं पटोले यांनी सांगितलं.
- यावेळी नाना पटोले म्हणाले, “महाराष्ट्र हे देशात कोरोना वाढवणारं राज्य आहे.
- ज्या राज्याने इथल्या जनतेने मदत करण्याचं काम केलं, त्या जनतेचा अवमान करण्याचा अधिकार मोदींना नाही.
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अपमान जनता आता सहन करणार नाही.
- जोवर मोदी महाराष्ट्रातल्या जनतेची माफी मागत नाही तोवर आंदोलन सुरूच राहील.
- प्रत्येक जिल्ह्यात भाजपा कार्यालयासमोर काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे.
- यावेळी जमावाने पंतप्रधान मोदी यांच्या निषेधार्थ तसंच राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ घोषणाही दिल्या.
- मोदी ते तानाशाही नही चलेगी, मोदी तेरी हिटलरशाही नही चलेगी, राहुल गांधी तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, झुठा है झुठा है नरेंद्र मोदी झुठा है, अशी घोषणाबाजी यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली.
औरंगाबादमध्येही आंदोलनाचे पडसाद
- औरंगाबादमध्येही काँग्रेस पक्षाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला.
- शहर काँग्रेसच्या वतीने मुकुंदवाडी परिसरात आज बुधवारी आंदोलन करण्यात आले.
- मुकुंदवाडीतील शिवाजी पुतळ्यासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकत्र येत पंतप्रधानांविरोधात घोषणाबाजी केली.
- तसेच पंतप्रधानांनी माफी मागावी, अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली.
परळीत पंकजा मुंडेंच्या ऑफिसबाहेर काळे झेंडे दाखवून निदर्शने
- परळीमध्येही बुधवारी भाजपा नेत्या आणि राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या कार्यालयाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.
- काँग्रेसने आंदोलन करत काळे झेंडे दाखवून निदर्शने केली.
- पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी नाही मागितल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा येईल, असा इशाराही देण्यात आला.
- परळीत काँग्रेसचे शहराध्यक्ष बहादूर भाई यांच्या नेतृत्वात काँग्रेस कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले.
- लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धन्यवाद प्रस्तावावर बोलताना महाराष्ट्राचा अपमान केला.
- हा महाराष्ट्रातील १२ कोटीजनतेचा अपमान आहे.
- त्यामुळे मोदींनी तात्काळ महाराष्ट्राची माफी मागावी यासाठी परळी शहर काँग्रेसच्या वतीने मोदीविरोधी घोषणा दिल्या गेल्या.