Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

काँग्रेस आक्रमक: ४ सप्टेंबरला मोदी सरकारवर हल्ला बोल, ७ सप्टेंबरपासून ३५०० किमीची भारत जोडो यात्रा!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Bharat Jodo Andolan And rahul gandhi

मुक्तपीठ टीम

देशातील वाढत्या महागाईच्या विरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. महागाईविरोधात काँग्रेसने आपल्या प्रस्तावित रॅलीची तारीख पुढे ढकलली आहे. येत्या ४ सप्टेंबर रोजी ‘महागाईविरोधात हल्लबोल रॅली’ काढण्याचा निर्णय काँग्रेसने बैठकीत घेतला. यापूर्वी ही रॅली २८ ऑगस्टला काढणार असल्याचे काँग्रेसने म्हटलं होतं. तसेच काँग्रेस ७ सप्टेंबरपासून आपली ३५०० किमी लांबीची भारत जोडो यात्रा सुरू करणार आहे, जी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत काढली जाईल.

महागाईविरोधात काँग्रेसचे आक्रमक आंदोलन!!

  • काँग्रेसने आपला हल्लाबोल कार्यक्रम गावांपासून शहरांपर्यंत सुरू ठेवण्याची योजना आखली आहे.
  • गुरुवारी संध्याकाळी महागाईविरोधातील आपल्या प्रदेश प्रभारी आणि पदाधिकाऱ्यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत काँग्रेसने महागाईविरोधातील रस्त्यावरील लढ्याबाबत सविस्तर चर्चा करून आगामी रोडमॅप ठरवला.
  • या बैठकीत गुजरात, महाराष्ट्र, छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाणा, बिहार, यूपी आणि झारखंड काँग्रेसमधील नेते सहभागी झाले होते.
  • काँग्रेसचे मीडिया प्रभारी जयराम रमेश यांनी ही माहिती दिली.
  • या रॅलीतून असंवेदनशील मोदी सरकारला कडक संदेश दिला जाणार आहे.
  • २५ ऑगस्टला जिल्हास्तरावर आणि २७ ऑगस्टला ब्लॉक स्तरावर ‘महागाईविरोधात हल्लबोल, दिल्ली चलो’ परिषद होणार आहे.
  • १७ ते २३ ऑगस्ट २०२२ या कालावधीत पक्ष सर्व विधानसभा मतदारसंघातील बाजारात आणि इतर अनेक ठिकाणी ‘महागाई चौपाल’ सभा आयोजित करेल.
  • २८ ऑगस्ट २०२२ रोजी महागाईविरोधात हल्लबोल या रॅलीमध्ये त्याची सांगता होईल

७ सप्टेंबरपासून काँग्रेसची भारत जोडो यात्रा !!

  • ४ सप्टेंबरला रामलीला मैदानावर होणाऱ्या प्रस्तावित रॅलीत देशभरातून पक्षाचे लोक येणार आहेत.
  • या रॅलीतून असंवेदनशील नरेंद्र मोदी सरकारला कडक संदेश दिला जाईल, असं जयराम सांगतात.
  • दिल्लीत ४ सप्टेंबरला होणाऱ्या या सभेला राहुल गांधी संबोधित करणार आहेत.
  • रॅलीत महागाईबरोबरच बेरोजगारी, खाद्यपदार्थांवरील जीएसटी आदी मुद्द्यांवरूनही सरकारला घेरणार आहे.
  • काँग्रेस नेत्याचे म्हणणे आहे की, एक मजबूत आणि रचनात्मक विरोधक असल्याने काँग्रेस रस्त्यावर उतरून सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर जनतेमध्ये जाईल.
  • दुसरीकडे काँग्रेस ७ सप्टेंबरपासून आपली ३५०० किमी लांबीची भारत जोडो यात्रा सुरू करणार आहे, जी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत काढली जाईल.

Tags: CongressHalla Bol rallykanyakumariMaharashtraModi govtकाँग्रेस आक्रमकभारत जोडो यात्रामोदी सरकारहल्ला बोल
Previous Post

महाराष्ट्रानंतर दिल्ली! दिल्लीचे उपमुख्यमंत्री सीबीआयच्या रडारवर! समजून घ्या नेमकं प्रकरण…

Next Post

केजरीवाल सरकारच्या शैक्षणिक क्रांतीला घाबरून मोदी सरकारचा पोपट मनीष सिसोदिया यांच्या घरी हजर!

Next Post
Manish Sisodia

केजरीवाल सरकारच्या शैक्षणिक क्रांतीला घाबरून मोदी सरकारचा पोपट मनीष सिसोदिया यांच्या घरी हजर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!