मुक्तपीठ टीम
देशातील वाढत्या महागाईच्या विरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. महागाईविरोधात काँग्रेसने आपल्या प्रस्तावित रॅलीची तारीख पुढे ढकलली आहे. येत्या ४ सप्टेंबर रोजी ‘महागाईविरोधात हल्लबोल रॅली’ काढण्याचा निर्णय काँग्रेसने बैठकीत घेतला. यापूर्वी ही रॅली २८ ऑगस्टला काढणार असल्याचे काँग्रेसने म्हटलं होतं. तसेच काँग्रेस ७ सप्टेंबरपासून आपली ३५०० किमी लांबीची भारत जोडो यात्रा सुरू करणार आहे, जी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत काढली जाईल.
महागाईविरोधात काँग्रेसचे आक्रमक आंदोलन!!
- काँग्रेसने आपला हल्लाबोल कार्यक्रम गावांपासून शहरांपर्यंत सुरू ठेवण्याची योजना आखली आहे.
- गुरुवारी संध्याकाळी महागाईविरोधातील आपल्या प्रदेश प्रभारी आणि पदाधिकाऱ्यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत काँग्रेसने महागाईविरोधातील रस्त्यावरील लढ्याबाबत सविस्तर चर्चा करून आगामी रोडमॅप ठरवला.
- या बैठकीत गुजरात, महाराष्ट्र, छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाणा, बिहार, यूपी आणि झारखंड काँग्रेसमधील नेते सहभागी झाले होते.
- काँग्रेसचे मीडिया प्रभारी जयराम रमेश यांनी ही माहिती दिली.
- या रॅलीतून असंवेदनशील मोदी सरकारला कडक संदेश दिला जाणार आहे.
- २५ ऑगस्टला जिल्हास्तरावर आणि २७ ऑगस्टला ब्लॉक स्तरावर ‘महागाईविरोधात हल्लबोल, दिल्ली चलो’ परिषद होणार आहे.
- १७ ते २३ ऑगस्ट २०२२ या कालावधीत पक्ष सर्व विधानसभा मतदारसंघातील बाजारात आणि इतर अनेक ठिकाणी ‘महागाई चौपाल’ सभा आयोजित करेल.
- २८ ऑगस्ट २०२२ रोजी महागाईविरोधात हल्लबोल या रॅलीमध्ये त्याची सांगता होईल
७ सप्टेंबरपासून काँग्रेसची भारत जोडो यात्रा !!
- ४ सप्टेंबरला रामलीला मैदानावर होणाऱ्या प्रस्तावित रॅलीत देशभरातून पक्षाचे लोक येणार आहेत.
- या रॅलीतून असंवेदनशील नरेंद्र मोदी सरकारला कडक संदेश दिला जाईल, असं जयराम सांगतात.
- दिल्लीत ४ सप्टेंबरला होणाऱ्या या सभेला राहुल गांधी संबोधित करणार आहेत.
- रॅलीत महागाईबरोबरच बेरोजगारी, खाद्यपदार्थांवरील जीएसटी आदी मुद्द्यांवरूनही सरकारला घेरणार आहे.
- काँग्रेस नेत्याचे म्हणणे आहे की, एक मजबूत आणि रचनात्मक विरोधक असल्याने काँग्रेस रस्त्यावर उतरून सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर जनतेमध्ये जाईल.
- दुसरीकडे काँग्रेस ७ सप्टेंबरपासून आपली ३५०० किमी लांबीची भारत जोडो यात्रा सुरू करणार आहे, जी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत काढली जाईल.