Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

प्रा. हरी नरके यांना कॉ. गोविंद पानसरे पुरस्कार प्रदान!

नाशिक येथे कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालय व कॉ. गोविंद पानसरे प्रबोधन पुरस्कार समिती आयोजित कॉ. गोविंद पानसरे प्रबोधन पुरस्कार सोहळा

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
comrade govind pansare award to pro hari narake

मुक्तपीठ टीम

“२१ वे शतक हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आहे. डॉ. आंबेडकरांनी भारताला दिलेल्या राज्यघटनेमुळे हा भारत बहुजनांच्या हिताचा राहील. आजचा भारत दलित,कष्टकरी, श्रमिक यांच्या श्रमावर उभा असून तो फॅसिस्ट हिंदुत्ववाद्यांच्या हातात जाणार नाही. आज भारत आर्थिक दृष्ट्या श्रीलंकेच्या वळणावर निघालेला आहे, हे खरे असले तरी भारतातला शेतकरी त्याला आपल्या श्रमाच्या जोरावर उपाशी राहू देणार नाही. आजच्या आर्थिक, धार्मिक, राजकीय आणि सांस्कृतिक संघर्षाला तोंड द्यायचे असेल तर लेखक – कलावंतांनी निर्भीडपणे अभिव्यक्त व्हायला पाहिजे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी कॉ. गोविंद पानसरे प्रबोधन पुरस्कार प्रसंगी केले.

comrade govind pansare award to pro hari narake

२०२१ सालचा कॉ. गोविंद पानसरे प्रबोधन पुरस्कार डॉ. गेल ओम्वेट यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला, तर २०२२ सालचा कॉ. गोविंद पानसरे प्रबोधन पुरस्कार विचारवंत प्रा. हरी नरके यांना प्रदान करण्यात आला. तसेच सामाजिक कार्यकर्ता म्हणून श्री. युवराज बावा, इरफान शेख आणि आबासाहेब थोरात यांना गौरविण्यात आले.

भारतातल्या कष्टकऱ्यांच्या चळवळीचा श्वास बनून डॉ. गेल ओम्वेट यांनी कार्य केले असे सांगून भारतातल्या सर्व प्रागतिक प्रवाहांना वैचारिक दिशा कॉ. पानसरे यांनी दिली असे भावोद्गार गेल ओमवेट यांचा पुरस्कार स्वीकारताना त्यांचे पती डॉ. भारत पाटणकर यांनी केले.

भारतीय संविधान सर्व समाजातल्या लोकांपर्यंत पोहोचवण्याची मोहीम सुरू करणे ही काळाची गरज आहे . सध्या देशात लोकशाहीच्या नावाखाली संविधानातील मूलभूत तत्वांची पायमल्ली होत ववआहे. डॉ.आंबेडकरांनी सुचविलेल्या मूलभूत गोष्टींकडे दुर्लक्ष करून अपप्रचार करण्याचे काम राज्यकर्ते करताहेत. असे प्रतिपादन सत्काराला उत्तर देताना प्रा. हरी नरके यांनी केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष उत्तम कांबळे होते. सर्वसामान्य माणूस जागा होतोय, संघटित होतोय आता त्याने संघर्षास सज्ज व्हायला हवे असे मत या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांनी मांडले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुरस्कार समितीचे समन्वयक डॉ.मिलिंद कसबे यांनी केले, तर सूत्र संचालन मनीषा कापुरे यांनी केले.
या प्रसंगी माजी सनदी अधिकारी बी. जी. वाघ, कॉ. राजू देसले, कॉ. सुबोध मोरे, डॉ.कैलास कमोद, रवी सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.


Tags: comrade govind pansare awardnashikprof hari narkeकविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालयकॉ. गोविंद पानसरे पुरस्कारनाशिकप्रा. हरी नरके
Previous Post

दिल्लीत कोरोनामुळे पुन्हा मास्क सक्ती, नाहीतर दंड! मुंबईतही वाढले रुग्ण!!

Next Post

राज्यात १८७७ नवे रुग्ण, १९७१ बरे! मुंबई ६८३, नाशिक ५१, नागपूर ३१ नवे रुग्ण !!

Next Post
maharashtra corona report

राज्यात १८७७ नवे रुग्ण, १९७१ बरे! मुंबई ६८३, नाशिक ५१, नागपूर ३१ नवे रुग्ण !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!