मुक्तपीठ टीम
देशभरातील वाढत्या इंधनदरामुळे मध्ये त्रासलेल्या सर्वसामान्यांसाठी आणि व्यावसायिकांसाठी आनंदाची बातमी आहे. आज एलपीजी सिलिंडरचे नवीन दर जाहीर करण्यात आले असून आज इंडेन सिलिंडर १३५ रुपयांनी स्वस्त झाला आहे. पेट्रोलियम कंपनी इंडियन ऑइलने व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ही कपात केली आहे, तर घरगुती एलपीजी सिलिंडर ग्राहकांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. मुंबईत १९ किलोच्या सिलेंडरची किंमत २,३०६ रुपयांवरून २,१७१.५० रुपयांवर आली आहे.
१ जूनपासून या दराने सिलिंडर उपलब्ध होणार…
या बदलानंतर दिल्लीत १९ किलोच्या सिलेंडरची किंमत २,२१९ रुपयांवर पोहोचली आहे. याआधी हे सिलेंडर २,३५४ रुपयांना मिळत होते. याप्रमाणे कोलकात्यात व्यावसायिक सिलेंडरची किंमत २,४५४ रुपयांवरून २,३२२ रुपयांवर, मुंबईत २,३०६ रुपयांवरून २,१७१.५० रुपयांवर आणि चेन्नईमध्ये २,३७३ रुपयांवरून २,५०७ रुपयांवर आली आहे.
गेल्या महिन्यात दोनदा भाव वाढले…
मे महिन्यात घरगुती एलपीजी सिलिंडरच्या ग्राहकांना दोनदा धक्का बसला होता. ७ मे रोजी घरगुती सिलिंडरच्या दरात प्रथमच ५० रुपयांनी वाढ करण्यात आली १९ किलोचा व्यावसायिक सिलिंडर सुमारे 10 रुपयांनी स्वस्त झाला. १९ मे रोजी घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीतही वाढ करण्यात आली. त्यामुळे १४ किलोच्या घरगुती सिलिंडरच्या दरात ३.५० रुपयांनी तर १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या दरात ८ रुपयांनी वाढ करण्यात आली होती.