Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ई-श्रम पोर्टलवर नोंदणी झालेले २६ कोटी मजुरांचं मासिक उत्पन्न १० हजाराखाली! ७४% एसटी, एससी, ओबीसी!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
E-shram Portal

मुक्तपीठ टीम

देशातील असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नोंदणीसाठी सरकारने ई-श्रम पोर्टल सुरु केले आहे. ई-श्रम पोर्टल श्रमिक वर्गाला उत्पन्नाचे वेगळे पर्यायही उपलब्ध करून देते. ई-श्रम पोर्टलवर आतापर्यंत २७.६९ कोटी असंघटित क्षेत्रातील कामगारांची नोंदणी झाली आहे. त्यापैकी ९४ टक्के म्हणजे जवळपास २६ कोटी कामगार दरमहा १० हजार रूपयांपेक्षाही कमी कमावतात. ई-श्रम पोर्टलच्या नवीनतम आकडेवारीवरून, ही माहिती समोर आली आहे. तसंच पोर्टलवर नोंदणीकृत कामगारांपैकी ७४ टक्के कामगार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांमधील आहेत.

या राज्यांमध्ये सर्वाधिक नोंदणी

  • नोंदणीच्या बाबतीत उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश आणि ओडिशा ही पाच राज्ये पुढे आहेत.
  • नोंदणीकृत कामगारांपैकी ५२.११ टक्के कामगारांचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे.
  • ९.९३ टक्के घरांमध्ये काम करतात तर ९.१३ टक्के बांधकाम क्षेत्रात काम करतात.

७४% एसटी, एससी, ओबीसी वर्गातील कामगार

  • ४.३६ टक्के लोक १० हजार ते १५ हजार दरम्यान आहे.
  • पोर्टलवर नोंदणीकृत कामगारांपैकी ७४ टक्के कामगार हे समाजातील मागासलेल्या घटकातील आहेत.
  • त्यापैकी ४५.३२ टक्के ओबीसी, २०.९५ टक्के अनुसूचित जाती आणि ८.१७ टक्के अनुसूचित जमाती प्रवर्गातील आहेत.
  • सर्वसाधारण श्रेणीतील कामगारांची संख्या २५.५६ टक्के आहे.

२०२१ मध्ये मागास कामगारांची संख्या ७२.५८%

  • नोव्हेंबर २०२१ मध्ये, असंघटित क्षेत्रातील १० हजार रुपयांपेक्षा कमी दरमहा कमाई करणाऱ्या कामगारांची संख्या ९२.३७ टक्के होती.
  • त्यावेळी पोर्टलवर ८ कोटींहून अधिक कामगारांची नोंदणी झाली होती. पोर्टलवर नोंदणीकृत एससी, एसटी आणि ओबीसी प्रवर्गातील कामगारांची संख्या ७२.५८ टक्के होती.

ई-श्रम पोर्टलवर नोंदणी वाढल्याने समाजात मोठ्या प्रमाणात असमानता असल्याचे दिसत आहे. या पोर्टलवर असंघटित क्षेत्रातील सर्व कामगारांची नोंदणी करण्याचे लक्ष्य आहे. असंघटित क्षेत्रातील कामगारांची संख्या सुमारे ३८ कोटी आहे.

ई-श्रम पोर्टलचा हेतू काय आहे?

  • देशातील असंघटित क्षेत्रातील कामगारांचा एनडीयूडब्ल्यू तयार करणे हे ई-श्रम पोर्टलचे उद्दिष्ट आहे.
  • हे पोर्टल २६ ऑगस्ट २०२१ रोजी लाँच करण्यात आले.
  • या पोर्टलद्वारे देशातील असंघटित क्षेत्रातील कामगारांना कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याचा सरकारचा मानस आहे.

६१.७२ टक्के कामगार १८ ते ४० वयोगटातील कामगार

  • ६१.७२ टक्के कामगार १८ ते ४० वयोगटातील असून २२.१२ टक्के कामगार ४० ते ५० वयोगटातील आहेत.
  • पोर्टलवर नोंदणीकृत १३.२३ टक्के कामगार ५० वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत.
  • २.९३ टक्के लोक १६ ते १८ वर्षे वयोगटातील आहेत.
  • पोर्टलवर नोंदणीकृत कामगारांपैकी ५२.८१ टक्के महिला आणि ४७.१९ टक्के पुरुष आहेत.

Tags: E-shram portalgood newsMonthly IncomeMuktapithOBCSCSTUnorganized SectorWorking Classअसंघटित क्षेत्रई-श्रम पोर्टलएसटीएससीओबीसीकामगार वर्गचांगली बातमीमासिक उत्पन्नमुक्तपीठ
Previous Post

केंद्राच्या योजनांमध्ये राज्याचा मोठा वाटा, पंधरा जिल्ह्यातील लाभार्थींशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा संवाद

Next Post

व्यावसायिक गॅस सिलिंडर आता १३५ रुपयांनी स्वस्त!

Next Post
indane

व्यावसायिक गॅस सिलिंडर आता १३५ रुपयांनी स्वस्त!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!