Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नव्या वर्षात होणार मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी आरामदायी प्रवास

September 6, 2026
in उपयोगी बातम्या, घडलं-बिघडलं
0
central railway

मुक्तपीठ टीम

मध्य रेल्वेच्या प्रवशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वेदरम्यान प्रवास करताना येणारा अडथळा हा कायमस्वरूपी दूर होणार आहे. आता नव्या वर्षात लोकल प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी ठाणे-दिवादरम्यान मेल-एक्स्प्रेस आणि लोकलसाठी स्वतंत्र मार्ग खुला करण्यात येणार आहे. हा मार्ग उपलब्ध झाल्यानंतर ८०-१०० लोकलफेऱ्या वाढवण्याचा पर्याय उपलब्ध होईल.

असा असेल प्रकल्प

  • नवीन रेल्वे मार्गाला जुन्या रेल्वे रुळांची जोडणी देण्याची आणि यार्ड जोडणीची कामे सध्या बाकी आहेत.
  • ठाणे आणि दिवा या दोन्ही ठिकाणी ही जोडणी द्यावी लागणार आहे.
  • तांत्रिक काम अचूक पद्धतीने पूर्ण व्हावे, यासाठी अनुभवी ज्येष्ठ अधिकाऱ्यांची जादा कुमक तैनात करण्यात आली आहे.
  • ‘एमआरव्हीसीकडून प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यात येईल.
  • मात्र, लोकलफेऱ्या किती वाढणार, त्या साध्या असतील की वातानुकूलित, यांचा निर्णय मध्य रेल्वेने घ्यायचा आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
  • जानेवारीत प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर टप्प्याटप्याने लोकल फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत.
  • विनावातानुकूलित एका लोकलगाडीच्या साधारण १०-१२ फेऱ्या होतात.
  • यामुळे एकाचवेळी फेऱ्या वाढवण्याऐवजी प्रवासी मागणी लक्षात घेऊन आवश्यक त्या ठिकाणी वाढीव लोकल चालविण्यात येतील.

प्रकल्पाचा घटनाक्रम

  • २००८मध्ये हा प्रकल्प कागदावर मंजूर झाला.
  • अतिक्रमण, खारफुटी, परवानगी या अडथळ्यांची शर्यत पार करत या प्रकल्पाचे काम आता जानेवारी २०२२मध्ये पूर्ण होणार आहे.
  • २००८ मध्ये प्रकल्पखर्च १३० कोटी होता.
  • प्रकल्प पूर्ण होईपर्यंत खर्चाने ५४० कोटीपर्यंत उड्डाण केले असल्याची माहिती एमआरव्हीसीने दिली.
  • ठाणे-दिवादरम्यानची पाचवी आणि सहावी मार्गिका नववर्षाच्या मुहूर्तावर अर्थात जानेवारी २०२२ मध्ये खुला करण्यात येणार आहे.
  • तांत्रिक कामे वगळता अन्य कामे पूर्ण झाल्याने प्रवाशांचा नव्या वर्षात सुखकर प्रवास शक्य होईल.

Tags: Central RailwayCentral Railway passengers new yearComfortable travelमध्य रेल्वे
Previous Post

विजयादशमीला संरक्षण क्षेत्रात नवे सीमोल्लंघन! आयुध निर्माणी मंडळातून ७ नव्या सरकारी कंपन्या!

Next Post

सरसंघचालकांनी ड्रग-ओटीटी-बीटकॉइन-लोकसंख्या नियंत्रणाकडे वेधले लक्ष, मंदिर नियंत्रण मुक्ती आणि प्लास्टिक मुक्तीचाही सांगितला मंत्र!

Next Post
imp issues in rss chief mohan bhagwat speech

सरसंघचालकांनी ड्रग-ओटीटी-बीटकॉइन-लोकसंख्या नियंत्रणाकडे वेधले लक्ष, मंदिर नियंत्रण मुक्ती आणि प्लास्टिक मुक्तीचाही सांगितला मंत्र!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!