Thursday, June 12, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राजू श्रीवास्तव यांचं निधन: ऑटो ड्रायव्हर ते विनोदाचा बादशाह! जीवनही बॉलिवुड चित्रपट कथेसारखाच…

September 21, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Raju Srivatsava (1)

मुक्तपीठ टीम

लोकप्रिय अभिनेते-कॉमेडियन राजू श्रीवास्तव सध्या एम्समध्ये मृत्यूशी लढा देत होते. अखेर आज वयाच्या ५९ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  राजू श्रीवास्तव यांना १० ऑगस्ट रोजी हृदयविकाराचा झटका आला होता, त्यानंतर त्यांना ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) च्या अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले. त्यांना व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका आला त्याच दिवशी त्यांची अँजिओप्लास्टी झाली. मात्र, त्यानंतर त्यांची प्रकृती आणखी बिघडली. त्यांचा मेंदू मृत अवस्थेत पोहोचला. ते व्हेंटिलेटरवर होते. जीवनभर आपल्या निर्भेळ विनोदांनी कोट्यवधींच्या चेहऱ्यांवर हास्य फुलवणारे राजू श्रीवास्तवांचं जाणं डोळ्यांमध्ये अश्रू आणणारं ठरलं आहे…

Raju Srivatsava (5)

राजू श्रीवास्तव यांची रिक्षाचालक म्हणून सुरुवात…

  • राजू श्रीवास्तव यांचा जन्म २५ डिसेंबर १९६३ रोजी कानपूर येथे झाला.
  • राजू श्रीवास्तव मायानगरीत मुंबईत आले.
  • मात्र सुरुवातीच्या काळात त्यांना खूप संघर्ष करावा लागला.
  • त्याच्याकडे पैशांची कमतरता होती आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी त्याला सुरुवातीच्या दिवसांत ऑटो रिक्षाही चालवली.
  • ऑटो चालवतानाही ते आपलं लक्ष्य विसरले नाहीत. त्यांनी कॉमेडी सुरुच ठेवली.
  • ऑटो चालवत असताना अचानक त्यांच्या नशिबाने वळण घेतले आणि त्यांना एका कॉमेडी शोमधून बोलावण्यात आले.
  • तिथून राजू श्रीवास्तवचे आयुष्य बदलले.
  • त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही.
  • त्याला डीडी नॅशनल वाहिनीवर शो करण्याची संधी मिळाली.
  • त्यानंतर त्याने ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमध्ये भाग घेतला आणि तो उपविजेता ठरला.
  • तेथेच त्यांना ओळख देणाऱ्या गजोधर भैय्याचा जन्म झाला.

Raju Srivatsava (4)

एका शोला फक्त ५० रुपये!

राजू श्रीवास्तव यांना सुरुवातीच्या काळात मुंबईत खूप संघर्ष करावा लागला. एक शो करण्यासाठी त्यांना फक्त 50 रुपये मिळायचे. त्या काळात विनोदी कलाकारांना फारशी मागणी नव्हती. राजू श्रीवास्तव यांनी सांगितले होते की, त्यांना फक्त जॉनी लिव्हरकडे पाहून प्रेरणा मिळत असे. एक दिवस आपले आयुष्य बदलेल, अशी खात्री वाटत असे.

Raju Srivatsava (3)

राजू श्रीवास्तव मोठ्या पडद्यावरही…

राजू श्रीवास्तव यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्येही काम केले.

  • १९८८ मध्ये त्यांनी तेजाबमध्ये पहिल्यांदा काम केले.
  • १९९१ मध्ये मैं ने प्यार किया
  • १९९३ मध्ये बाजीगर आणि मिस्टर आझाद
  • १९९४ मध्ये अभय,
  • २००१ मध्ये आमदनी अठन्नी खर्चा रुपइया
  • २००२ मध्ये वाह! तेरा क्या कहना
  • २००३ मध्ये मैं प्रेम की दीवानी हूं
  • २००६ मध्ये विद्यार्थी: द पॉवर ऑफ स्टुडंट्स
  • २००७ मध्ये बिग ब्रदर अँड बॉम्बे टू गोवा
  • २०१० मध्ये भावनाओं को समझो और बारूद: द फायर – अ लव स्टोरी’
  • २०१७ शेवटचा चित्रपट टॉयलेट: एक प्रेम कथा

Raju Srivatsava (2)

राजू श्रीवास्तव राजकारणातही!

  • अभिनयासोबतच राजू श्रीवास्तव यांनी राजकारणातही प्रवेश केला.
  • २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना समाजवादीने कानपूरमधून रिंगणात उतरवले होते.
  • मात्र पक्षाच्या स्थानिक नेत्यांकडून पुरेसा पाठिंबा मिळत नसल्याने त्यांनी तिकीट परत केले.
  • १९ मार्च २०१४ रोजी त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना स्वच्छ भारत अभियानात सहभागी केले.
  • उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांची यूपी फिल्म विकास परिषदेच्या अध्यक्षपदी निवड केली.

Tags: aiimsRaju Srivastavaएम्सकॉमेडियन राजू श्रीवास्तवराजू श्रीवास्तव
Previous Post

पालघरच्या गावातील तरुणीची राष्ट्रीय झेप, अहमदाबादची फुटबॉल स्पर्धा तन्वी पाटील गाजवणार!

Next Post

आज काय बोलणार ठाकरे? शिंदेंचे बंड, बंडखोरांचे आरोप, कदमांचं पातळी सोडून बोलणं आणि भाजपा…मुद्दे अनेक!

Next Post
Uddhav Thackeray both hands in action

आज काय बोलणार ठाकरे? शिंदेंचे बंड, बंडखोरांचे आरोप, कदमांचं पातळी सोडून बोलणं आणि भाजपा...मुद्दे अनेक!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!