मुक्तपीठ टीम
आता भारतातही बुलेट ट्रेन आणि हाय स्पीड ट्रेनच्या डबे आणि चाकांचं उत्पादन होणार आहे. आतापर्यंत हे सर्व साहित्य भारताला युरोपमधून आयात करावे लागत होते. परंतु, आता याही क्षेत्रात भारताने पाऊल उचललं आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही मोठी घोषणा केली आहे. यासंदर्भात निविदा काढण्यात आली आहे. यामुळे देशात रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.
हाय स्पीड चाकांच्या निर्मितीच्या माध्यमातून दरवर्षी किमान ८० हजार चाकांची निर्मिती करण्याचा सरकारचा मानस असून, या चाकांचा निर्यातदार होण्यासाठी ब्लू प्रिंट तयार करण्यात आली आहे.रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, रेल्वेने प्रथमच खासगी कंपन्यांना रेल्वे चाक प्लांट उभारण्यासाठी आमंत्रित केले आहे.
- या ‘मेक इन इंडिया’ प्लांटमध्ये हायस्पीड ट्रेन आणि पॅसेंजर डब्यांसाठी चाकं बनवली जाणार आहेत.
- दरवर्षी येथे ८०,००० चाकांसाठी ६०० कोटी रुपयांची खरेदी केली जाईल.
- रेल्वेने चाक निर्मितीसाठी खासगी क्षेत्राला आमंत्रित करून निविदा काढण्याची ही पहिलीच वेळ आहे.
- भारतीय रेल्वेला दरवर्षी दोन लाख चाकांची गरज असते त्यासाठी हे पाऊल उचल्ले आहे.
- स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (सेल) एक लाख चाकांचे उत्पादन करणार आहे.
- उर्वरित एक लाख चाकं या नवीन ‘मेक इन इंडिया’ प्लांटमध्ये तयार केली जातील.
- या प्लांटमध्ये बनवलेल्या रेल्वेच्या चाकांची निर्यात केली जाईल आणि ही युरोपीयन बाजारपेठेत निर्यात केली जाईल.
- १८ महिन्यांत प्लांट बसवण्यात येईल, अशी तरतूदही निविदेत करण्यात आली आहे.