मुक्तपीठ टीम
कृषी आणि बांधकाम क्षेत्रात जगातील अग्रणी कंपनी असणाऱ्या सीएनएच इंडस्ट्रीयलने (NYSE:CNHI / MI:CNHI) उत्तर भारतात देशाची राजधानी नवी दिल्लीच्या नैऋत्येस असलेल्या गुरूग्राम शहरात आपल्या नवीन इंडिया टेक्नोलॉजी सेंटरचे अधिकृत उद्घाटन केले. उत्पादन विकास आणि डिजीटल सुविधा यांच्यावर लक्ष केंद्रित करणारे हे धोरणात्मक स्थान कंपनीच्या जागतिक संशोधन आणि विकासाचा महत्वपूर्ण भाग आहे.
सीएनएच इंडस्ट्रीयलचे टेक्नोलॉजी सेंटर हे अशा प्रकारचे देशातील पहिलेच केंद्र असून अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि क्षमतांनी सुसज्ज आहे. त्यात नाविन्यपूर्णता केंद्र, वाहन अनुकृती आणि जागतिक तंत्रज्ञान प्रणीत प्रकल्पांना पूरक अत्याधुनिक एक्सटेंडेड रिअॅलिटी/व्हर्च्युअल रिअॅलिटी प्रयोगशाळा यांचा समावेश आहे. मार्च २०२१ मध्ये या केंद्राच्या कामकाजाला सुरुवात झाली आणि सुरुवातीचा लवकर परतावा लक्षात घेऊन सुधारित अनुकृती क्षमतांसह उत्पादन, एम्बेडेड सॉफ्टवेअर, डेटा अॅनॅलिटिक्स, यूजर इंटरफेस आणि युजर एक्सपिरीअन्स (UI/UX) साठी पुढील रचना विकास ठरविण्यात आला. भारतात अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि डिजीटल परिसंस्था निर्माण करून अधिकाधिक क्षमतांसह ग्राहकांना लाभ मिळवून देण्यासाठी ही साईट आपल्या जगभरातील संशोधन आणि विकास केंद्रांबरोबर सहयोग प्रयत्नांकरता धोरणात्मक भूमिका पार पाडेल.
“भारताचा प्रचंड क्षमतेचा, उभरता आर्थिक विकास आणि कुशल मनुष्यबळ यामुळे आमच्या व्यवसायाच्या विस्तार आणि वाढीसाठी ही आकर्षक बाजारपेठ आहे,” असे सीएनएच इंडस्ट्रीयलचे आशिया पॅसिफिक विभागाचे अध्यक्ष चून वॉयतेरा म्हणाले. “गेल्या १० वर्षांत, सीएनएच इंडस्ट्रीयलने आमच्या भारतीय उत्पादन, संशोधन आणि विकास, पुरवठा आधार आणि पुरवठा साखळी विकास अशा विविध क्षेत्रांत ठळक गुंतवणूक केली आहे. नवीन टेक्नोलॉजी सेंटर कृषी आणि बांधकाम क्षेत्राला पाठबळ देण्यासाठी संबंधित क्षमता साधने पुरवत असल्यामुळे भारताला औद्योगिक केंद्राच्या जोडीला तंत्रज्ञान केंद्रही बनविण्याच्या आमच्या दृष्टीकोनाला बळकटी देईल.”
“सीएनएच इंडस्ट्रीयलचे इंडिया टेक्नोलॉजी सेंटर हे कंपनीच्या जागतिक संशोधन आणि विकास विभागाचा महत्वाचा भाग आहे. आमचा भारतातील व्यवसाय आणि कंपनीचा जागतिक उत्पादन पोर्टफोलिओ या दोन्हीला पाठबळ देण्यासाठी सॉफ्टवेअर, एम्बेडेड इलेक्ट्रोनिक्स आणि डेटा अॅनॅलिटिक्स यांचा अंतर्भाव असलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान सेंटर तर्फे विकसीत होईल,” असे सीएनएच इंडस्ट्रीयलचे चीफ इन्फर्मेशन ऑफिसर आणि अंतरिम चीफ टेक्नोलॉजी आणि क्वालिटी ऑफिसर मार्क केर्मीश म्हणाले.
सीएनएच इंडस्ट्रीयल इंडियाचे कंट्री मॅनेजर रौनक वर्मा म्हणाले, “नवीन टेक्नोलॉजी सेंटरमुळे सीएनएच इंडस्ट्रीयलसाठी भारतातील धोरणात्मक स्थान उंचावत असून आमच्या ग्राहकांना अधिक चांगली सेवा पुरविण्यासाठी आमच्या क्षमतांमध्ये सुधारणा करण्यासाठी तांत्रिक साधने आणि स्त्रोत पुरवत आहे.”
सेंटर क्लाऊड, एम्बेडेड, इलेक्ट्रिफीकेशन, ऑटोनॉमस, सुधारित विश्लेषण, सिम्युलेशन, ऑटोमेशन आणि यांत्रिक आणि विद्युत रचना यांचा समावेश असलेल्या ग्राहककेंद्री सॉफ्टवेअर सुविधा आणि तंत्रज्ञान यांच्या क्षमता विकासावरही सेंटर लक्ष केंद्रित करणार आहे.
गुरूग्राम एसईझेड (सायबर सिटी)मध्ये वसलेल्या टेक्नोलॉजी सेंटरमध्ये आज १०० हून अधिक जण कार्यरत आहेत आणि वैविध्याला प्राधान्य देणाऱ्या विविधांगी कुशल मनुष्यबळाची नियुक्ती करून ते त्यांचे कार्य वेगाने वाढवत आहेत.
सीएनएच इंडस्ट्रीयल इंडिया केस आयएचच्या माध्यमातून न्यू हॉलंड अॅग्रीकल्चर आणि केस कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट ब्रँड्स मधून ३० वर्षांहून अधिक काळ ‘मेड इन इंडिया’ द्वारे जागतिक अभियांत्रिकी सर्वोत्तमता पुरवत देशाला सेवा देत आहे. त्यांना २०१८ मध्ये स्थापन झालेल्या सीएनएच इंडस्ट्रीयल कॅपिटल इंडिया या समर्पित वित्तीय शाखेचे पाठबळ आहे.
CNH Industrial (NYSE: CNHI / MI: CNHI) is a world-class equipment and services company. Driven by its purpose of Breaking New Ground, which centers on Innovation, Sustainability and Productivity, the Company provides the strategic direction, R&D capabilities, and investments that enable the success of its five core Brands: Case IH, New Holland Agriculture and STEYR, supplying 360° agriculture applications from machines to implements and the digital technologies that enhance them; and CASE and New Holland Construction Equipment delivering a full lineup of construction products that make the industry more productive. Across a history spanning over two centuries, CNH Industrial has always been a pioneer in its sectors and continues to passionately innovate and drive customer efficiency and success. As a truly global company, CNH Industrial’s 35,000+ employees form part of a diverse and inclusive workplace, focused on empowering customers to grow, and build, a better world.