मुक्तपीठ टीम
महानगर गॅस लिमिटेड (MGL) ने पुन्हा एकदा सीएनजी आणि पीएनजीच्या किंमतीत वाढ केली आहे. महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरात प्रति किलो ३.५ रुपये आणि पीएनजीच्या दरात १.५ रुपयांची वाढ केली आहे. हे दर शुक्रवारी मध्यरात्रीपासून लागू होतील. मुंबईत सीएनजीचे वाढलेले दर ८९.५० प्रति किलो तर घरगुती पीएनजी दर ५४ रुपये प्रति एससीएम असे जाहीर करण्यात आले आहेत. देशाच्या आर्थिक राजधानीत पीएनजीची किंमत १.५ रुपयांच्या वाढीसह प्रति एससीएम ५४ रुपये झाली आहे.त्यामुळे सर्वसामान्यांना आता महागाईचा फटका बसणार आहे.
किंमत किती वेळा वाढली?
- महानगर गॅस लिमिटेडने ऑक्टोबरपासून दुसऱ्यांदा दर वाढवले आहेत.
- यापूर्वी, कंपनीने ऑक्टोबर २०२२ मध्ये सीएनजी-पीएनजीची किंमत वाढवण्याचा निर्णय घेतला होता, तेव्हा सीएनजी प्रति किलो ६ रुपये आणि पीएनजी ४ रुपयांनी वाढवले होते.
- केंद्राने ऑक्टोबरच्या सुरुवातीस आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत देशांतर्गत उत्पादित गॅसच्या किमतीत ४० टक्क्यांपर्यंत वाढ केली होती.
- १ एप्रिल रोजी, वाहनांमध्ये इंधन म्हणून वापरल्या जाणार्या सीएनजीची किंमत ६० रुपये प्रति किलो होती, तर घरगुती स्वयंपाकाचा गॅस पीएनजी ३६ रुपये होता.
महागाईचा फटका सर्वसामान्यांना बसणार!!
- मुंबईत सीएनजी-पीएनजीचे दर यंदा वाढतच चालले आहेत.
- सरकारच्या या निर्णयामुळे लोकांचे वाहने चालवणे आणि सार्वजनिक वाहतुक वाहने चालवणे महाग होणार आहे. तसेच पीएनजीच्या किमतीत वाढ झाल्याने त्यांच्या घराचे बजेटही कोलमडणार आहे.
- सरकारने ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये सलग दोन वेळा सीएनजी-पीएनजीच्या किमती वाढवल्या आहेत. त्यामुळे महागाईचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे.