मुक्तपीठ टीम
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भांडुपच्या रुग्णालय अग्निकांडाच्या ठिकाणी भेट दिली. ते म्हणाले, कोरोनाची गंभीरता लक्षात घेऊन सनराईझ रुग्णालयाला तात्पुरती परवानगी दिली असेल.
ज्या रुग्णांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबीयांशी मी दिलगीरी व्यक्त करतो. त्यांची हानी भरून येणार नाही. पण त्यांना नुकसानभरपाई दिली जाईल. पण काही झालं तरी जे जबाबदार असतील त्यांना सोडले जाणार नाही. भंडाऱ्याच्या आगीनंतर सगळ्या रुग्णालयांची पाहणी केली गेली. या मॉलमधील आग रुग्णालयात पसरली. तरीही दोषी असणाऱ्यांवर कारवाई होईल.
अग्निशमन दलाने खूप चांगले काम केले. रुग्णांचे जीव वाचवले. आताही ते धुमसणारी आग विझवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. माध्यमांनी आत जाऊ नये.
काही वेळेला नाइलाजाने मदत घ्यावी लागते. कोरोना संकटामुळे अशी परवानगी दिली आहे. अनेक मॉलना फायर ऑडिटची सूचना दिलेली आहे. जी रुग्णालयं इतर वास्तूत असतील तेथे केवळ रुग्णालयांचे नाही तर संपूर्ण वास्तूचे फायर ऑडिट करण्याचे आदेश देत आहोत.