Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“महिलांनो तुम्ही कमकुवत नाहीत, आत्मनिर्भर व्हा, महाराष्ट्र पोलीस तुमच्या पाठीशी”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आवाहन

July 17, 2021
in सरकारी बातम्या
0
CM Uddhav Thackeray

मुक्तपीठ टीम

महिलांनो तुम्ही कमकुवत नाही आत्मनिर्भर व्हा, तुमच्याकडे कोणी वाईट नजरेने पाहिले तर त्याला धडा शिकवा,महाराष्ट्र पोलीस सदैव तुमच्या पाठीशी राहिल,असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

 

महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्पाचे ऑनलाईन उद्धाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. येथील अलंकार हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमास गृह (ग्रामीण ) राज्यमंत्री शंभूराज देसाई, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव (ऑनलाईन), पोलीस महासंचालक संजय पांडे (ऑनलाईन), विशेष पोलीस महासंचालक (महिला व बाल) राज वर्धन (ऑनलाईन), जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, नगराध्यक्षा माधवी कदम, महिला व बाल कल्याण सभापती सोनाली पोळ आदी उपस्थित होते.

 

महिलांनी आत्मनिरभर झाले पाहिजे, मला कोणाचीही गरज नाही असा आत्मविश्वास बाळगला पाहिजे. कुणी तुमच्यावर वाईट नजर टाकली तर त्याला धडा शिकवला पाहिजे तुमचे अनुकरण संपूर्ण देशाने केले पाहिजे, महाराष्ट्र पोलीस सदैव तुमच्या पाठीशी राहिल. महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्प हा महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकले आहे.

 

पोलीसाबद्दल तळमळ, आपुलकी, आस्था आहे. पोलीस १८ तास काम करतात. ऊन, वारा व पावसाची तमा न बाळगता जनतेचे रक्षण करतात. गेली दिड वर्ष कोरोनाशी आपण लढत आहोत. या लढाईत अनेक पोलीस बाधित झाले, काहींचा दुर्दैवी मृत्यु झाला. महाराष्ट्र पोलीस जनतेच्या संरक्षणासाठी काम करीत आहे. सातारा पोलीस दलाने महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्पास विविध समाज माध्यमांचा वापर करुन आधुनिकतेशी सांगड घातली आहे. या प्रकल्पाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी शुभेच्छाही दिल्या.

 

प्रास्ताविकात गृह (ग्रामीण) राज्यमंत्री देसाई म्हणाले, पोलीस विभागातील ज्या महिला व पुरुष कर्मचाऱ्यांना ज्युडो कराटे येतात, अशा कर्मचाऱ्यांकडून शाळा, महाविद्यालयातील मुलींना स्वत:ची सुरक्षा कशी करता येईल यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शाळा व महाविद्यालये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन सुरु आहेत. महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्पामुळे छेडछाडी, अपवृत्तींना आळा बसण्यास मोठी मदत होणार आहे. याचबरोबर चार्जशिट वेळेत दाखल करणे, गुन्हा नोंदविणे, तपासणीला गती मिळणार आहे. या प्रकल्पामुळे अपप्रवृत्तींना धाक बसणार असून गुन्ह्यांचेही प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पाचे चांगले परिणाम दिसल्यास हा प्रकल्प राज्यात राबवू, असेही देसाई यांनी सांगितले.

 

या प्रकल्पाचे सादरीकरण उपविभागीय पोलीस अधिकारी आंचल दलाल यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे केले तर सर्वांचे आभार प्रदर्शन पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी मानले. या कार्यक्रमास विविध संस्थाच्या महिला पदाधिकारी, महिला उपस्थित होत्या.

 


Tags: chief minister uddhav thackeraymaharashtra policesataraमहाराष्ट्र पोलीसमहिला व बाल कल्याण सभापती सोनाली पोळमुख्यमंत्री उद्धव ठाकरेशंभूराज देसाई
Previous Post

“भूजल संपत्तीच्या जतन व संवर्धनासाठी लोकसहभाग महत्त्वाचा”- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post

वारीच्या मार्गावरील आनंदयात्री…दाता असो वा घेता, दोघांनाही समाधान!

Next Post
Wari

वारीच्या मार्गावरील आनंदयात्री...दाता असो वा घेता, दोघांनाही समाधान!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!