Tuesday, May 20, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home चांगल्या बातम्या सरकारी बातम्या

“दररोज पंधरा लाख लसीकरणाची शासनाची तयारी”- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मालाड येथील आधुनिक तंत्रज्ञानाने उभारलेल्या जम्बो कोरोना सेंटरचे लोकार्पण

June 28, 2021
in सरकारी बातम्या
0
CM Uddhav Thackeray

मुक्तपीठ टीम

तिसऱ्या संभाव्य लाटेची शक्यता असताना आपल्याला अधिक सावध राहिले पाहिजे, जगात इतरत्र कोरोनाच्या डेल्टा प्लसचा संसर्ग परत वाढत असून आपल्याकडे सध्या रुग्णसंख्या घटत असली तरी आरोग्याचे नियम काटेकोरपणे पाळणे अतिशय महत्वाचे आहे असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शासनाची दररोज १५ लाख लसीकरणाची तयारी असल्याचे स्पष्ट केले. एमएमआरडीएने मालाड येथे आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करीत उभारलेल्या समर्पित कोरोना रुग्णालयाचे हस्तांतरण मुंबई महानगरपालिकेला करण्यात आले त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

 

सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या कार्यक्रमातनगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक, परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर, मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबालसिंह चहल, महानगर आयुक्त एस के श्रीनिवासन उपस्थित होते.

CM Uddhav Thackeray

पुढच्यास ठेच , मागचा शहाणा

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, कोरोनाची दुसरी लाट ओसरली नसून सध्या जरी बेडस रिकामे दिसत असले तरी दुसरी लाट परत उलटू नये म्हणून आपल्याला गर्दी टाळणे, मास्क घालणे हे नियम कटाक्षाने पाळावे लागतील. पुढच्यास ठेच , मागचा शहाणा या म्हणीप्रमाणे आपण जगभर कोरोनाची लाट परत उसळत आहे ते पाहून सावध राहावे लागेल पहिल्या लाटेच्या वेळेस आपण बीकेसी येथे देशातले पहिले फिल्ड रुग्णालय विक्रमी वेळेत उभारले. आपण आरोग्य सुविधांच्या उभारणीत आणि नागरिकांच्या आरोग्याचे हित जोपासताना कोणतीही उणीव भासू देणार नाही असे सांगून मुख्यमंत्र्यांनी दररोज १५ लाख लसी देण्याची तयारी असल्याचे स्पष्ट केले. प्रारंभी महानगर आयुक्त श्रीनिवासन यांनी प्रास्ताविक केले.

CM Uddhav Thackeray

मालाडच्या जम्बो कोरोना सेंटरची व इतर माहिती

  • या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सध्याच्या कोरोना सेंटर्समधील बेडची संख्या वाढवण्यासोबतच चार नवीन कोरोना सेंटरही सुरु करणार.
  • त्यापैकीच एक म्हणजे मालाड जम्बो कोरोना सेंटर होय. या सेंटरमध्ये २१७० बेडस् आहेत. त्यात जवळपास ७० टक्के म्हणजे १,५३६ ऑक्सिजन बेड तर १९० आयसीयू बेड आहेत. लहान मुलांसाठी २०० ऑक्सिजन पेडियाट्रिक बेड आणि ५० पेडियाट्रिक आयसीयू बेड आहेत.
  • मालाड जम्बोसह दुसऱ्या टप्प्यामध्ये कांजूरमार्ग, सायन, वरळी रेसकोर्स हे नवीन जम्बो सेंटर देखील सुरु करण्यात येणार आहेत. तर नेस्को, रिचर्डसन ऍण्ड क्रूडास भायखळा आणि एनएससीआय मधील बेडची संख्या वाढवली जात आहे.
  • जम्बो कोरोना सेंटर्सच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पहिल्या टप्प्यापेक्षाही अधिक म्हणजे ८,३२० इतके बेड उपलब्ध होत आहेत. यात ७० टक्के म्हणजे ५, ९८६ ऑक्सिजन बेड तर १,१४० आयसीयू बेड आहेत. लहान मुलांसाठी स्वतंत्र असे ६०० ऑक्सिजन व १५० आयसीयू बेड आहेत.
  • पहिला आणि दुसरा असे दोन्ही टप्पे मिळून जम्बो कोविड सेंटर्समधील एकूण बेड संख्या आता १५ हजार ६२७ होते आहे. त्यात ९,१९३ ऑक्सिजन बेड, १,५७२ आयसीयू बेड आहेत.
  • यामध्ये लहान मुलांसाठी एकूण १,२०० ऑक्सिजन पेडियाट्रिक बेड आणि १५० पेडियाट्रिक आयसीयू बेड उपलब्ध असतील.
  • जम्बो सेंटर्सच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण ऑक्सिजन बेड, आयसीयू बेड आणि पेडियाट्रिक बेडची संख्या अधिकाधिक असेल, यावर भर दिला आहे.
  • जम्बो सेंटर्सच्या संख्येमध्ये जर आपण महानगरपालिकेची प्रमुख रुग्णालये, उपनगरीय रुग्णालये, सेव्हन हिल्स हॉस्पिटल यांची बेरीज केली तर आता एकूण बेडसची संख्या ही १९ हजार ९२८ म्हणजे जवळपास २० हजार इतकी होते आहे.
  • पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये मिळून आतापर्यंत सुमारे ७७ हजारांपेक्षा अधिक रुग्णांना या जम्बो कोरोना सेंटरमध्ये उपचार
  • जम्बो कोरोना सेंटर्सच्या पहिल्या टप्प्यामध्ये बीकेसी कोरोना सेंटर, गोरेगाव नेस्को कोरोना सेंटर, वरळी एनएससीआय संकूल, मुलूंड रिचर्डसन ऍण्ड क्रूडास, भायखळा रिचर्डसन ऍण्ड क्रूडास आणि दहिसर जम्बो कोरोना सेंटर असे प्रमुख सहा कोरोना सेंटर सुरु.
  • या ६ जम्बो कोरोना सेंटर्समध्ये मिळून ७ हजार ३०७ बेडस् आहेत. ज्यात ३ हजार २०७ ऑक्सिजन बेड तर ४३२ आयसीयू बेड आहेत. सोबत लहान मुलांसाठी ६०० बेडदेखील आहेत.
  • संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना देखील कोविडची बाधा होवू शकते, हे लक्षात घेऊन लहान मुलांसह नवजात बाळांसाठी स्वतंत्र व जास्तीत जास्त बेड उपलब्ध करणे आवश्यक आहे.
  • यामध्ये जवळपास ११ हजार बेड हे ऑक्सिजन सह तर २,३४८ आयसीयू आहेत.
  • सोबतच, लहान मुलांसाठी १,५०० ऑक्सिजन पेडियाट्रिक बेड आणि २३० पेडियाट्रिक आयसीयू बेड उपलब्ध असतील. नवजात बाळांसाठी ६० बेडदेखील यामध्ये बनविण्यात आले आहेत.
  • कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून आतापर्यंत (२७ जून २०२१) मुंबईत एकूण ७ लाख २० हजार ३५६ बाधित रुग्ण आढळले. यापैकी ६ लाख ९४ हजार ०८२ (९६.३५ टक्के) रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत.
  • इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होण्यासाठी नियमित रुग्णालयांसोबतच जम्बो कोरोना सेंटर्सनीदेखील खऱ्या अर्थाने मोलाचा हातभार लावला आहे.
  • मुंबईत जवळपास २० हजारावर कोरोना बेड उपलब्ध आहेत. म्हणजेच बाधितांवर उपचारांसाठी पुरेशा संख्येने बेड उपलब्ध आहेत.

 


Tags: coronaMinister Eknath ShindeMinority Minister Nawab Malikइकबालसिंह चहलएकनाथ शिंदेकिशोरी पेडणेकरनवाब मलिकबाळासाहेब थोरातमुख्यमंत्री उद्धव ठाकरेमुंबई
Previous Post

अजित पवारांवरील रागाचा सुप्रिया सुळेंना फटका, ताईंनी शांतपणे घातली समजूत!

Next Post

गौण खनिजाच्या स्वामित्वधनाच्या दरात सुधारणा

Next Post
MINOR MINERAL

गौण खनिजाच्या स्वामित्वधनाच्या दरात सुधारणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!