Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“ई-ऑफीस प्रणाली वापरण्यास सोपी आणि सुलभ असावी”- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

April 2, 2021
in सरकारी बातम्या
0
E-office

मुक्तपीठ टीम

माहिती तंत्रज्ञान विभागाने ई-ऑफीस प्रणाली अधिक सोपी, सुटसुटीत आणि वापरण्यास सुलभ करावी अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.

माहिती तंत्रज्ञान विभागाच्यावतीने मुख्यमंत्री ठाकरे ई-ऑफीस प्रणालीचे सादरीकरण करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, माहिती तंत्रज्ञान विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱ्हाड, संचालक माहिती तंत्रज्ञान रणजित कुमार आदी अधिकारी उपस्थित होते.

ज्या विभागात मोठ्या प्रमाणात नस्त्यांची निर्मिती होते त्या विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ई-ऑफीस प्रणालीचे प्रशिक्षण देण्यात यावे अशा सूचना करून मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, ई-ऑफीस प्रणालीचे सर्व विभागांच्या सचिव आणि संबंधित मंत्र्यांसमोर सादरीकरण करण्यात यावे. त्यांच्या सूचनाही घेण्यात याव्यात. ई-ऑफीसच्या माध्यमातून मुख्यमंत्री कार्यालयात येणारा पत्रव्यवहार हाताळतांना संबंधितांना त्यासंबंधीच्या सूचना व त्यांनी पाठवलेल्या पत्रावरची कार्यवाही कळवली जावी. ही ई-ऑफीस प्रणाली सुरक्षित आणि परिपूर्ण असावी असेही मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले.

विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला यांनी १५ शासकीय विभागांच्या १५०० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ई -ऑफीस प्रणालीचे प्रशिक्षण दिले असल्याची माहिती दिली.


Tags: chief minister uddhav thackeraye-office systemई-ऑफीस प्रणालीमुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Previous Post

“आघाडी सरकारने उद्योग क्षेत्राचा विश्वास गमावल्याने जीएसटी घटला”

Next Post

“पुढील वर्षापासुन ‘युवा शेतकरी’ व ‘कृषी संशोधक’ पुरस्कार देणार” – कृषीमंत्री दादाजी भुसे

Next Post
dadaji bhuse

"पुढील वर्षापासुन ‘युवा शेतकरी’ व ‘कृषी संशोधक’ पुरस्कार देणार" - कृषीमंत्री दादाजी भुसे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!