Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा ‘हा’ इशारा ऐकाच!

March 12, 2021
in Uncategorized, आरोग्य, घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
Uddhav Thackeray -11-2-21

मुक्तपीठ टीम

 

महाराष्ट्रात आज दिवसभरात १४ हजारापेक्षा जास्त कोरोना रुग्ण सापडले. तसेच सक्रिय रुग्णसंख्येनं एक लाखाचा टप्पा ओलांडला. कोरोनाचा उद्रेक होत असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी पुढील मुद्दे मांडले:

 

आपण लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर

  • राज्यात करोना सगळीकडे वाढतो आहे.
  • कोरोनाचा उद्रेक टाळण्यासाठी केवळ प्रार्थना नव्हे प्रयत्नही करा!
  • आवश्यकता भासल्यास आपल्याला पुन्हा लॉकडाऊन करावा लागणार आहे’,
  • करोनाचा धोका वाढत चालला आहे.
  • राज्यात करोनाची दैनंदिन रुग्णसंख्या २ हजारापर्यंत तर मुंबईत ३०० पर्यंत खाली आली होती.
  • मात्र गेल्या काही दिवसांत हा आकडा वेगाने वाढत आहे. राज्यात १२-१३ हजार नवीन रुग्णांची रोज भर पडत आहे.
  • त्यामुळे नियम पाळले गेले नाहीत तर परिस्थिती अधिक गंभीर होणार आहे. तेव्हा वेळीच सावध व्हा!

 

लक्षणविरहित रुग्णांनी निष्काळजीपणे फिरु नये!

  • लक्षणे नसलेले रुग्ण सध्या मोठ्या प्रमाणात आढळत आहेत.
  • त्यात मला लक्षणे नाहीत मग मी बाहेर गेलो तर काय फरक पडतो, अशी काहींची मानसिकता आहे.
  • यातून कुटुंबच्या कुटुंबं बाधीत होत आहेत.
  • यात कुटुंबातील एखाद्याची प्रकृती अधिक बिघडली तर काय संकट ओढवेल याचा विचार करा.
  • इतका निष्काळजीपणा दाखवू नका, अशी विनंतीही मुख्यमंत्र्यांनी केली.

 

राज्यात लवकरच काही बंधने

  • गेल्या फेब्रुवारीत महाराष्ट्रात करोनाने शिरकाव केला होता. त्यानंतर या फेब्रुवारीत कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे.
  • आता पुन्हा तसाच उद्रेक टाळायचा असेल तर आपल्याला केवळ प्रार्थना नव्हे प्रयत्न करावे लागतील.
  • कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळावेच लागतील.
  • राज्यात काही बाबतीत बंधने घातली जाणार असून याबाबत नियमावली येत्या एक दोन दिवसांत जाहीर करण्यात येईल.

 

पाश्चिमात्य देशांपासून धडा शिका!

  • पहिल्या लाटेपेक्षा करोनाची दुसरी लाट अधिक तीव्र असते हे स्पष्ट झालेले आहे.
  • पाश्चिमात्य देशात थेट महिना-दोन महिने असा लॉकडाऊन लावावा लागला आहे.
  • ब्राझीलमध्ये करोनाचा हाहाकार सुरू आहे.
  • ही वेळ आपल्यावर येऊ नये, यासाठी आपल्याला खबरदारी बाळगायची आहे. मला लॉकडाऊन होऊ द्यायचे नाही पण नियम पाळले गेले नाहीत तर पर्याय उरणार नाही.

 


Tags: chief minister uddhav thackeraycoronamahararashtraकोरोनामहाराष्ट्रमुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Previous Post

महाराष्ट्रात कोरोना उद्रेक…१४ हजार नवे रुग्ण, सक्रिय रुग्ण लाखावर!

Next Post

एमपीएससी पूर्व परीक्षा आठवडाभरात, शुक्रवारी तारीख कळणार!

Next Post
mpsc agitation -1

एमपीएससी पूर्व परीक्षा आठवडाभरात, शुक्रवारी तारीख कळणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!