Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरील शस्त्रक्रिया यशस्वी

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
cm uddhav thackeray neck surgery successful

मुक्तपीठ टीम

गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मानेचा आणि मणक्याचा त्रास होत होता. त्यामुळे त्यांना बुधवारी एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर शुक्रवारी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मुख्यमंत्री ठाकरेंवरील शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचं डॉक्टरांनी माहिती दिली असून १ तास ही शस्त्रक्रिया चालली.

 

मुख्यमंत्री ठाकरेंवरील शस्त्रक्रिया यशस्वी

  • बुधवारी कॅबिनेटच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
  • कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांनी आपल्या आरोग्याबाबतची माहिती दिली होती.
  • मानेजवळील स्नायू दुखावले गेले असून सोमवारी केलेल्या तपासणीत हे स्पष्ट झालं.
  • सुरुवातीला घरीच त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते.
  • पण, तपासणी केली असता डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता.
  • अखेर, मुख्यमंत्र्यांनी शस्त्रक्रिया करण्यास होकार दर्शवला आणि ते रुग्णालयात दाखल झाले.
  • सकाळी साडेसात वाजता मुख्यमंत्र्यांवरील शस्त्रक्रिया सुरू झाली होती.
  • तासभर ही शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
  • मुख्यमंत्री ठाकरेंवरील शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचं डॉक्टरांनी माहिती दिली.
  • तर आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पुढच्या आठवड्यात उद्धव ठाकरेंची फिजिओथेरेपी सुरू होणार असल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं.

मुख्यमंत्र्यांचं रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीचं निवेदन…

  • मुख्यमंत्र्यांनी आपल्या प्रकृतीसंदर्भात एक निवेदन प्रसिद्ध केले होते.
  • “गेल्या सुमारे दोन वर्षांपासून कोरोनाचा मुकाबला करत आहोत.
  • एकीकडे या विषाणूशी लढाई सुरू असताना दुसरीकडे आपले जीवनचक्र सुरू राहावे, राज्यातली विकासकामे सुरूच राहावीत म्हणून आम्ही सगळे कुठेही न थांबता सातत्याने प्रयत्न करतोय.
  • मानदेखील वर करायला वेळ मिळत नव्हता, साहजिकच माझ्या मानेच्या दुखण्याकडे नाही म्हणलं तरी थोडंसं दुर्लक्ष झाले आणि मानेवर जो परिणाम व्हायचा तो झालाच.
  • त्यामुळे या दुखण्यावर व्यवस्थित उपचार व्हावेत या दृष्टीने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात दाखल होत असून दोन-तीन दिवस तिथेच राहून योग्य ते उपचार घेणार आहे.
  • आपले आशीर्वाद पाठीशी आहेत, त्यामुळे लवकरच तब्येत बरी होईल”, अशी खात्री असल्याचे मुख्यमंत्र्यांनी निवदेनात नमूद केले होते.

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती उत्तम, डॉक्टरांची माहिती

  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील सर्व्हायकल स्पाईन संबंधित शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती एच.एन. रिलायन्स रुग्णालयाचे डॉ अजित देसाई आणि डॉ शेखर भोजराज यांनी दिली आहे.
  • या शस्त्रक्रियेदरम्यान मुख्यमंत्र्यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर होती व आता शस्त्रक्रियेनंतर त्यांना रुग्णालयातील त्यांच्या कक्षात हलविण्यात आले असून त्यांची प्रकृती उत्तम आणि स्थिर आहे असेही डॉक्टरांनी सांगितले आहे. डॉ अजित देसाई हे हृदयरोग तज्ञ असून डॉ शेखर भोजराज हे स्पाईन सर्जन आहेत.

Tags: cm uddhav thackerayH.N. Reliance Hospitalneck surgeryएच. एन. रिलायन्स रुग्णालयमुख्यमंत्री उद्धव ठाकरेशस्त्रक्रिया
Previous Post

दिल्लीच्या एम्समध्ये डॉक्टरांसाठी २५४ जागांवर करिअर संधी

Next Post

प्रामाणिक करदात्यांमुळे देशाची अर्थव्यवस्था सक्षम – डॉ. भागवत कराड

Next Post
gyansangam

प्रामाणिक करदात्यांमुळे देशाची अर्थव्यवस्था सक्षम - डॉ. भागवत कराड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!