मुक्तपीठ टीम
गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मानेचा आणि मणक्याचा त्रास होत होता. त्यामुळे त्यांना बुधवारी एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर शुक्रवारी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मुख्यमंत्री ठाकरेंवरील शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचं डॉक्टरांनी माहिती दिली असून १ तास ही शस्त्रक्रिया चालली.
मुख्यमंत्री ठाकरेंवरील शस्त्रक्रिया यशस्वी
- बुधवारी कॅबिनेटच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
- कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांनी आपल्या आरोग्याबाबतची माहिती दिली होती.
- मानेजवळील स्नायू दुखावले गेले असून सोमवारी केलेल्या तपासणीत हे स्पष्ट झालं.
- सुरुवातीला घरीच त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते.
- पण, तपासणी केली असता डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता.
- अखेर, मुख्यमंत्र्यांनी शस्त्रक्रिया करण्यास होकार दर्शवला आणि ते रुग्णालयात दाखल झाले.
- सकाळी साडेसात वाजता मुख्यमंत्र्यांवरील शस्त्रक्रिया सुरू झाली होती.
- तासभर ही शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
- मुख्यमंत्री ठाकरेंवरील शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचं डॉक्टरांनी माहिती दिली.
- तर आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पुढच्या आठवड्यात उद्धव ठाकरेंची फिजिओथेरेपी सुरू होणार असल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं.
मुख्यमंत्र्यांचं रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीचं निवेदन…
- मुख्यमंत्र्यांनी आपल्या प्रकृतीसंदर्भात एक निवेदन प्रसिद्ध केले होते.
- “गेल्या सुमारे दोन वर्षांपासून कोरोनाचा मुकाबला करत आहोत.
- एकीकडे या विषाणूशी लढाई सुरू असताना दुसरीकडे आपले जीवनचक्र सुरू राहावे, राज्यातली विकासकामे सुरूच राहावीत म्हणून आम्ही सगळे कुठेही न थांबता सातत्याने प्रयत्न करतोय.
- मानदेखील वर करायला वेळ मिळत नव्हता, साहजिकच माझ्या मानेच्या दुखण्याकडे नाही म्हणलं तरी थोडंसं दुर्लक्ष झाले आणि मानेवर जो परिणाम व्हायचा तो झालाच.
- त्यामुळे या दुखण्यावर व्यवस्थित उपचार व्हावेत या दृष्टीने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात दाखल होत असून दोन-तीन दिवस तिथेच राहून योग्य ते उपचार घेणार आहे.
- आपले आशीर्वाद पाठीशी आहेत, त्यामुळे लवकरच तब्येत बरी होईल”, अशी खात्री असल्याचे मुख्यमंत्र्यांनी निवदेनात नमूद केले होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती उत्तम, डॉक्टरांची माहिती
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील सर्व्हायकल स्पाईन संबंधित शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती एच.एन. रिलायन्स रुग्णालयाचे डॉ अजित देसाई आणि डॉ शेखर भोजराज यांनी दिली आहे.
- या शस्त्रक्रियेदरम्यान मुख्यमंत्र्यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर होती व आता शस्त्रक्रियेनंतर त्यांना रुग्णालयातील त्यांच्या कक्षात हलविण्यात आले असून त्यांची प्रकृती उत्तम आणि स्थिर आहे असेही डॉक्टरांनी सांगितले आहे. डॉ अजित देसाई हे हृदयरोग तज्ञ असून डॉ शेखर भोजराज हे स्पाईन सर्जन आहेत.