Monday, May 19, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

मुख्यमंत्री ठाकरे नंदुरबारमध्ये, दुर्गम भागातही लसीकरणासाठी आवश्यक सुविधेचे आदेश

March 19, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
nandurbar visit (6)

मुक्तपीठ टीम

जिल्ह्याच्या दुर्गम भागातील नागरिकांना कोरोना लसीकरणासाठी आवश्यक सर्व सुविधा योग्य प्रकारे मिळतील याकडे विशेष लक्ष देण्यात यावे आणि लसीकरणानंतरदेखील नागरिकांनी मास्कचा वापर आणि शारीरीक अंतर राखणे या बाबींचे करावे यासाठी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात यावी, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

धडगाव येथे आयोजित जिल्हा आढावा बैठकीत ठाकरे बोलत होते. बैठकीस आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी, कृषि मंत्री दादाजी भुसे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, जि.प.अध्यक्षा ॲड.सीमा वळवी, आमदार मंजुळा गावित, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, कोरोना संसंर्ग वाढण्याची शक्यता असल्याने प्रतिबंधक उपाययोजनांवर विशेष भर देण्यात यावा. यावेळी एक ढाल म्हणून लसीकरणाची सुविधा आपल्याकडे आहे. लसीकरणाबाबत जनतेच्या मनातील शंका दूर करून लसीकरणाचा वेग वाढवावा. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे सर्वत्र पालन होईल याकडे विशेष लक्ष द्यावे. जिल्ह्याने जनजागृतीचे चांगले उपक्रम राबविले असून त्यात यापुढेही सातत्य राखण्यात यावे, असे ठाकरे यांनी सांगितले.

 

तोरणमाळ पर्यटन विकास आराखडा तयार करा

तोरणमाळ पर्यटन विकासाचा सूक्ष्म आराखडा तयार करावा, पर्यटन विकासाच्या माध्यमातून येथील रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी शासन सर्व सहकार्य करेल. विकास आराखडा तयार करताना प्राधान्यक्रम ठरविण्यात यावा. परिसरात पळसाची झाडे रांगेत लावण्यासारख्या पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या संकल्पना राबवाव्या. लवकरच पर्यटन मंत्र्यांच्या समवेत याबाबत बैठक घेण्यात येईल, असे ठाकरे यांनी सांगितले.

पालकमंत्री ॲड. पाडवी म्हणाले, जिल्ह्यात फळबाग लागवड कार्यक्रम राबविल्यास २०० डोंगर हिरवे होतील. त्यासाठी ग्रामपंचायतीचा सहभाग घेता येईल. जिल्ह्यातील आश्रम शाळांमधून सॅटेलाईट एज्युकेशन राबविण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.

मनरेगाच्या माध्यमातून यावर्षी विक्रमी फळबाग लागवड झाल्याचे कृषिमंत्री भुसे यांनी यावेळी सांगितले.

विभागीय आयुक्त गमे यांनी विभागातील कोरोना परिस्थितीची तर जिल्हाधिकारी डॉ. भारुड यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची माहिती दिली.

धडगाव येथे लसीकरणाचा आढावा

मुख्यमंत्र्यांनी धडगाव ग्रामीण रुग्णालय येथील लसीकरण केंद्राला भेट देऊन कोरोना लसीकरणाची माहिती घेतली. त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. कोरोना प्रतिबंधासाठी नागरिकांना मास्क घालून शारिरीक अंतर राखण्याचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले.

 

फळरोपवाटिकेची पाहणी

ठाकरे यांनी बैठकीनंतर कृषि विभागाच्या फळरोपवाटिकेची पाहणी केली. कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी पारंपरिक पद्धतीने धनुष्यबाण देऊन त्यांचे स्वागत केले. ठाकरे यांनी रोपवाटिकेबाबत समाधान व्यक्त केले. जिल्ह्यातील नागरिकांचे स्थलांतर रोखण्यासाठी फळबाग लागवड महत्वाची ठरेल. त्यादृष्टीने जिल्ह्यासाठी आणखी फळबाग रोपवाटिका तयार करण्यास शासन सहकार्य करेल असे त्यांनी यावेळी सांगितले. सीडबॉल तयार करून ते अधिक पाऊस असलेल्या भागातील उजाड डोंगरावर टाकण्याचा कार्यक्रम राबवावा, अशी सूचना ठाकरे यांनी केली.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी लसीकरणाबाबत दुर्गम भागातील जनतेला दिला विश्वास

मुख्यमंत्री ठाकरे यांनी मोलगी येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन लसीकरणाची माहिती घेतली. त्यांनी लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांशी चर्चा केली. दुर्गम भागातील माताभगिनी आणि बांधवाना कोरोना लसीकरणाची चांगली सुविधा मिळते का हे पाहण्यासाठी मोलगी येथून लसीकरण केंद्राच्या भेटीला सुरुवात करीत आहे असे त्यांनी सांगितले. ठाकरे म्हणाले, लस घेताना कोणतीही भीती मनात बाळगू नका. कोरोनाचे संकट वाढत असले तरी सर्वांनी निश्चय केल्यास त्यावर मात करता येईल. लस घेतल्यानंतरही मास्कचा वापर आणि शारीरिक अंतर राखण्याचे पालन करणे सुरू ठेवा. आपण स्वतः लस घेतली असून त्याचा कोणताही परिणाम होत नसल्याने घाबरू नका, अशा शब्दात त्यांनी लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना विश्वास दिला. ठाकरे यांनी लसीचा साठा करण्यासाठी पुरेशी व्यवस्था व शितपेटीसाठी आवश्यक विद्युत व्यवस्थेविषयी माहिती घेतली. त्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लसीकरण प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. ठाकरे यांनी पोषण पुर्नवसन केंद्राला भेट देऊन कुपोषीत बालकांवर करण्यात येणाऱ्या उपचारांची माहिती घेतली.

यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी ग्रामीण रुग्णालय परिसरात रानभाज्यांची आणि सातपुड्यातील पारंपरिक पिकांची माहिती घेतली. त्यांनी रानभाज्या पिकविण्याऱ्या आदिवासी बांधवांशी संवाद साधला आणि पारंपरिक वाणाचे संवर्धन केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. रानभाज्याना बाजारपेठ मिळावी यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

 

तोरणमाळ विद्युत उपकेंद्रासाठी सहकार्य करणार

मुख्यमंत्री ठाकरे यांनी धडगाव तालुक्यातील सुरवणी विद्युत उपकेंद्राच्या सुरु असलेल्या कामाची पाहणी केली व कामाबाबत समाधान व्यक्त केले. उर्वरित काम लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. काम पूर्ण करण्यासाठी शासन सर्व सहकार्य करेल, दुर्गम भागातील विजेची समस्या दूर करण्यासाठी तोरणमाळ येथील विद्युत उपकेंद्रासाठी १६ कोटींचा प्रस्ताव पाठविल्यास त्यालाही सहकार्य करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

हे उपकेंद्र पुर्णत्वास आल्यास अक्राणी अक्कलकुवा व परिसरातील २०० गांवे व अंदाजे ११ हजार ग्राहकांना याचा लाभ होणार आहे. या उपकेंद्रातून ३३ के.व्ही. दाबाने धडगांव, हातधुई, मोलगी, जमाना, काकरदा, पिंपळखुटा या गावांना विजपुरवठा करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत अक्राणी व अक्कलकुवा तालुक्यातील २२० गावांना शहादा उपकेंद्रातून वीज पुरवठा होत आहे. या उपकेंद्रामुळे ३३ के.व्ही. वाहिनीची लांबी कमी होणार असून त्यामुळे या भागातील भविष्यात येणारी वीजेची मागणी पूर्ण करण्यासाठी हे केंद्र महत्वपूर्ण ठरणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

nandurbar visit (3)

 

मुख्यमंत्र्यांचे मोलगी येथे स्वागत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी हेलिपॅडवर आगमन झाले. आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी आणि कृषि मंत्री दादाजी भुसे यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांच्या समवेत मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि आरोग्य सचिव प्रदीप व्यास होते.

ॲड. पाडवी यांनी सातपुड्यातील डाब येथील स्ट्रॉबेरी मुख्यमंत्र्यांना भेट दिली. प्रशासनाच्यावतीने विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे आणि जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. यावेळी आमदार मंजुळा गावीत, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, माजी मंत्री पद्माकर वळवी, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत आदी उपस्थित होते.

nandurbar visit (2)


Tags: cm uddhav thackerayvaccinationकोरोना संसंर्गमुख्यमंत्री उद्धव ठाकरेलसीकरण
Previous Post

*मनोरंजन महत्त्वाचे* १) अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहलीच्या घरी काही महिन्यांपूर्वी एका नव्या पाहुणीचे आगम झाले. सध्या सुरू असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेनिमित्त भारतीय क्रिकेट संघाची संपूर्ण टीम अहमदाबद येथे हॉटेलमध्ये थांबली आहे. त्यामुळे येथे प्रत्येकाच्या खोलीला नेमप्लेट देण्यात आले आहे. यात विराट कोहलीच्या खोलीबाहेर त्याची पत्नी अनुष्का, त्याचे आणि मुलगी वामिकाचे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे ते सध्या चर्चेत आहेत. २) अभिनेता अभिषेक बच्चन याचा ‘द बिग बुल’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर याची चर्चा सुरू आहे. ३) अभिनेता ऋषी सक्सेना याची ‘गुडबॉय’ ही वेब सीरिज नुकतीच प्रदर्शित झाली आहे. या नव्या वेब सीरीजला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. ‘हंगामा प्ले’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या या वेब सिरिजबद्दल प्रेक्षकांनी कौतुक केले आहे. ४) अभिनेता अक्षय कुमार याचा आगामी चित्रपट ‘राम सेतू’ सध्या चांगलाच चर्चेत आहे. या सिनेमाच्या शूटिंगची सुरूवात करण्यासाठी अक्षय कुमार, अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि नुसरत भरुचा हे अयोध्येला रवाना झाले आहेत. ५) आता अभिनेत्री मोनी रॉय लवकरच तिचा बॉयफ्रेण्ड सूरज नंबियार याच्यासोबत लग्नबंधनात अडकरणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मौनी तिच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. मोनी रॉयने काही दिवसांपूर्वी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सूरुज आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबासोबतचे काही फोटो शेअर केले होते.

Next Post

तुम्हाला एलपीजी सिलिंडरवर सबसिडी मिळतेय ना? लगेच चेक करा

Next Post
lpg

तुम्हाला एलपीजी सिलिंडरवर सबसिडी मिळतेय ना? लगेच चेक करा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!