Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुख्यमंत्र्यांचा ‘प्रश्नम’ लोकप्रियता क्रम, ठाकरे नं.१, शिवराज नं.२, योगी नं ५!

पंजाबमध्ये काँग्रेससाठी, तर गुजरातमध्ये भाजपासाठी धोक्याची घंटा!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
ut 2

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पद सांभाळणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. कोरोनाच्या काळात चांगलं नेतृत्व करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता वाढली आहे.’प्रश्नम’ या संस्थेने देशातील प्रमुख १३ राज्यांत सर्वेक्षण घेतले असून आपला त्रैमासिक अहवाल नुकताच जाहीर केला आहे. यात देशातील १३ राज्यांमधून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देशातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले आहेत.

प्रश्नम या संस्थेने देशातील १३ राज्य निवडली होती. यात हरियाणा, झारखंड, कर्नाटक, महाराष्ट्र, बिहार, गोवा, गुजरात, पंजाब, मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांचा समावेश होता. १३ राज्यात मिळून एकूण १७ हजार ५०० जणांनी आपले मत नोंदवलं आहे. त्यात लोकप्रियतेच्या बाबतीत उद्धव ठाकरे हे सर्वात पुढे असल्याचे स्पष्ट झाले. उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री म्हणून कामगिरी चांगली आहे आणि आम्ही पुन्हा त्यांना मतदान करू असं मत सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ४९ टक्के मतदारांनी नोंदवलं आहे.

लोकप्रिय मुख्यमंत्री-

  • लोकप्रियतेच्या बाबतीत उद्धव ठाकरे हे सर्वात पुढे आहेत.
  • मुख्यमंत्री ठाकरे यांच्यानंतर ४४ टक्के मतांनी दुसऱ्या स्थानी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे आहेत.
  • तिसऱ्या क्रमांकावर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत असून त्यांना ४० टक्के मतं मिळाली आहेत.
  • झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन चौथ्या तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पाचव्या स्थानी आहेत.

हे मुख्यमंत्री लोकप्रिय नाहीत-

  • सर्वेक्षणात पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांना ६० टक्के लोकांनी मुख्यमंत्र्यांची कामगिरी खराब असल्याचे सांगितले आणि त्यांना पुन्हा निवडूण देणे त्यांना पसंत नाही, असे ते म्हणाले.
  • केवळ १५ टक्के लोकच अमरिंदर यांच्या कारभारावर समाधानी आहेत पण पुन्हा त्यांना मत देणार नाही, असे त्यांनी सांगितले.
  • उत्तराखंडचे प्रकरण पूर्णपणे वेगळे आहे, कारण राज्यात नुकतेच एक नवीन मुख्यमंत्री आले आहेत.
  • एका वर्षाच्या आत राज्याला तिसरे मुख्यमंत्री मिळाले आहेत.
  • उत्तराखंडमध्ये भाजपने नेतृत्वबदल केला आहे.
  • मात्र आधीचे मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांच्याबद्दल या सर्वेक्षणात तब्बल ८० टक्के मते नकारात्मक होती.
  • गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबाबत नकारात्मक मते नोंदवली गेली आहेत.

Tags: cm uddhav thackerayप्रश्नममहाराष्ट्रमुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Previous Post

गारमेंट, यंत्रमाग उद्योगाला दिलासा, तयार कपडे-अन्य कापडांवर कर सवलती!

Next Post

पर्यटनविकासासाठी २५० कोटी निधीचे वितरण, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश

Next Post
Ajit pawar

पर्यटनविकासासाठी २५० कोटी निधीचे वितरण, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!