Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाराष्ट्राच्या हायस्पीड विकासासाठी सहकार्य करण्याचं मुख्यमंत्री ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना पत्र

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
cm & pm

मुक्तपीठ टीम

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नाशिक-मुंबई, मुंबई-पुणे-हैद्राबाद या बुलेट ट्रेन संदर्भात पत्र लिहिलं आहे. यामध्ये दोन बुलेट ट्रेन्सचा प्रस्ताव त्यांनी मोदी यांना दिला आहे.केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील विविध कार्यक्रमांदरम्यान विकासाची ब्लू प्रिंट मांडली होती. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही तातडीने पावलं उचलत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं.

 

मुख्यमंत्र्यांचं पत्र जसं आहे तसं

  • रेल्वे मंत्रालय, भारत सरकारने नुकत्याच मान्यता दिलेल्या सात हाय स्पीड रेल कॉरिडॉरपैकी महाराष्ट्रात नागपूर-नाशिक-मुंबई आणि मुंबई-पुणे-हैदराबाद यांचा समावेश आहे.
  • राष्ट्रीय हायस्पीड रेल कॉर्पोरेशन यांना जागेची पाहणी, व्यवहार्यता तपासण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
  • एमएसआरडीसीकडे या कॉरिडॉरच्या एकीकरणासाठी सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली आहे.
  • पुढे, NHSRCL ने नागपूर-मुंबई कॉरिडॉरसाठी पर्यायाचा अभ्यास केला आहे आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या साथीने हायस्पीड रेल कॉरिडॉर (HSRC) विकसित करण्याचा प्रस्ताव दिला आहे.
  • समृद्धी महामार्ग हा एक प्रवेश नियंत्रित हरित महामार्ग प्रकल्प आहे. त्याची रुंदी १२० मीटर राइट ऑफ वे (ROW) तर लांबी ७०१ किमी आहे.
  • १५ मार्च २०२१ रोजी NHSRCL प्रतिनिधींनी पर्याय सादर केला आणि नागपूर-मुंबई हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरसोबत समृद्धी महामार्गाची तांत्रिकदृष्ट्या व्यवहार्यता अभ्यासण्याची विनंती केली.
  • प्रस्तावित रेल्वे कॉरिडॉर हा एलिव्हेटेड (उन्नत मार्ग) असून वर आणि खाली लांबी आणि रुंदी अंदाजे १७.५० मीटर असेल, जी पुढे बदलली जाऊ शकते.
  • जर भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांनी समृद्धी महामार्गासाठी सहकार्य केले, तर मुंबई-नाशिक-नागपूर हाय स्पीड रेलची अंमलबजावणी लवकरात लवकर सुरु केली जाऊ शकते.
  • पुढे महाराष्ट्र सरकार असेही सुचवू इच्छिते की, मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वे ही समृद्धी महामार्गाच्या RoW मध्ये जालन्यापर्यंत असेल, ती पुढे हैदराबादपर्यंत वाढवली ​​जाऊ शकते.
  • महाराष्ट्र सरकारने जालना आणि नांदेड दरम्यान एक्स्प्रेस वेला आधीच मान्यता दिली आहे.
  • तर दुसरीकडे NHAI ने आधीच नांदेड ते हैदराबाद एक्सप्रेस वेची योजना आखली आहे.
  • हायस्पीड रेलला सामावून घेण्याचे समान तर्क लावल्यास नागपूर आणि मुंबई, मुंबई-हैदराबाद हायस्पीड रेलचे नियोजन जालना मार्गे मुंबई-नांदेडच्या बाजूनेही करता येईल आणि पुढे प्रस्तावित नांदेड आणि हैदराबाद एक्स्प्रेस वे च्या RoW मध्ये नेता येईल.
  • त्याचप्रमाणे पुणे आणि औरंगाबाद दरम्यानही हायस्पीड मार्ग देखील असणे आवश्यक आहे.
  • हे लक्षात घेतले पाहिजे की मुंबई-नागपूर हा मार्ग मुंबई-नाशिक-औरंगाबादला जोडतो. तर मुंबई-हैदराबाद मार्गाचे विद्यमान रचनेनुसार मुंबई ते पुणे हायस्पीड रेल मार्गाला जोडते.
  • महाराष्ट्र सरकारने पुणे आणि नाशिक दरम्यान सेमी-हायस्पीड रेल्वेची योजना आखली आहे.
  • पुणे आणि औरंगाबाद यांच्यात हायस्पीड रेल कनेक्टिव्हिटी झाल्यास हे चतुर्भुज पूर्ण होईल.
  • हा सर्वात महत्त्वाचा औद्योगिक कॉरिडॉर आहे.
  • तर पुणे-नाशिक-औरंगाबाद त्रिकोण आधीच राज्यातील वाहन उद्योगाचा आधारभूत आहे.

Tags: cm uddhav thackerayNitin GadkariPM Narendra modiनितीन गडकरीपंतप्रधान नरेंद्र मोदीमुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Previous Post

“महाराष्ट्रात ‘वात्सल्य’ची सरकारी माया विधवांना काही मिळेना…”

Next Post

गुगलचा आज २३ वा वाढदिवस! खास डुडल! पण वाढदिवस का बदलला?

Next Post
google

गुगलचा आज २३ वा वाढदिवस! खास डुडल! पण वाढदिवस का बदलला?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!