Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आक्रमक! आता विरोधकांना थेट आव्हान!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
cm uddhav thackeray

मुक्तपीठ टीम

संयमी प्रतिमा असणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता आक्रमक झाले आहेत. गेले काही दिवस भाजपा आणि मनसे नेत्यांकडून त्यांना वैयक्तिक लक्ष्य केलं जात आहे. गेल्या आठवड्यापासून त्यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत थेट संवादाला सुरुवात केली आहे. त्यात त्यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना चेतवत शिवसंपर्क अभियानातून शिवसेनेची संघटनात्मक बांधणी मजबूत करत असतानाच दुसरीकडे विरोधकांना सडेतोड उत्तरं देण्यास सुरुवात केली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हनुमान चालीसा आणि मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित करून महाविकास आघाडीवर आक्रमक भूमिका घेतली आहे. गुढीपाडव्याच्या सभेपासून ते औरंगाबाद सभेमध्ये राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा छेडला. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही १४ मे रोजी जाहीर सभेची घोषणा केली आहे. त्यावेळी काय तो सवाल-जवाब होऊनच जाऊ दे, असा इशाराच मुख्यमंत्र्यांनी दिला. मुख्यमंत्री ठाकरे शुक्रवारी रोजी भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या रौप्य महोत्सवात बोलत होते.

मुख्यमंत्री बनणे हे माझं स्वप्न कधीच नव्हते…

  • राजकारणात देशाचे शत्रू बाजूला पडले आहेत.
  • पण पक्षाचे शत्रू कोण याकडे बघितले जात आहे.
  • खालच्या दर्जाचे राजकारण सुरू झाले आहे.
  • मुख्यमंत्री होणे हे माझे स्वप्न कधीच नव्हते. पण मुख्यमंत्री माझ्या शिवसेनेचा होईल हेच माझे स्वप्न होते.
  • मी मुख्यमंत्री होईन असं कधी वाटलंही नव्हतं, पण महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं आणि मी मुख्यमंत्री झालो.
  • आता मी असेपर्यंत मुख्यमंत्री माझ्या पक्षाचा होत राहील, हेही माझं स्वप्न आहे.
  • ते स्वप्न तुम्ही पूर्ण कराल.
  • आव्हानं येत आहेत.
  • आव्हान आणि नवीन गोष्टी आपल्या देशात बघायला मिळत आहेत.
  • भविष्य अंधारात जाणार असेल तर आता तुम्ही कामाला लागले पाहिजे.
  • दमदार वाटचाल सुरू असताना आता थांबायचे नाही.

त्यावेळी काय तो सवाल-जवाब होऊनच जाऊ दे…

  • मी माझा उत्साह वाढवायला चाललो आहे.
  • कारण दमदार वाटचाल सुरू असताना मलासुद्धा जरा हुरूप येतो.
  • कारण मी हळूहळू कार्यक्रमाला सुरुवात केली आहे.
  • येत्या १४ तारखेला सभा घेतच आहे. त्यावेळी काय तो सवाल-जवाब होऊनच जाऊ दे.
  • कारण किती दिवस ऐकत बसायचे.
  • दुसरी बाजूही कळू दे

संजय राऊतांचा राष्ट्रवादीच्या बालेकिल्यात वेगळा हुंकार

  • शिवसेना नेते संजय राऊत रविवारी पुण्यातील शिरुर मतदारसंघात होते.
  • गेले काही महिने राष्ट्रवादीनं लोकसभेला शिवसेनेकडून हिरावून घेतलेल्या या मतदारसंघात शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी संघर्ष सुरु आहे.
  • तेथे क्रिकेट सामान्याच्या उद्घाटनप्रसंगी संजय राऊतांनी प्रत्यक्ष मैदानातही आणि शाब्दिक चौकार-षटकार मारले.
  • ते म्हणाले, शिरुर मतदारसंघातून पुढचा खासदार शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हेच असतील.
  • संजय राऊतांचा हा पवित्राही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नव्या आक्रमक रणनीतीचा भाग असल्याचे बोलले जाते.

Tags: cm uddhav thackerayMaharashtramnsMVARaj ThackerayShivsenaमनसेमहाराष्ट्रमहाविकास आघाडीमुख्यमंत्री उद्धव ठाकरेराज ठाकरेशिवसेना
Previous Post

महाराष्ट्रात बंदरे विकासाची प्रचंड क्षमता; साचलेला गाळ, पोर्ट झोनसाठी केंद्राच्या सहकार्याची आवश्यकता- अस्लम शेख

Next Post

छत्रपती शिवाजी, शाहू महाराज यांना अपेक्षित समाज, राज्य निर्मितीसाठी एकत्र येऊया- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post
Chief Minister Uddhav Thackeray

छत्रपती शिवाजी, शाहू महाराज यांना अपेक्षित समाज, राज्य निर्मितीसाठी एकत्र येऊया- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!