मुक्तपीठ टीम
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गेल्या काही दिवसांपासून मानेचं दुखण आणि मणक्याचा त्रास सुरु झाला आहे. सध्या त्यांच्यावर घरीच उपचार सुरु आहेत. पण आता येत्या दोन ते तीन दिवसांत त्यांच्या मणक्यावर पुढील उपचारासाठी शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे.
मानेजवळील स्नायू दुखावल्याने शस्त्रक्रिया
- उद्धव ठाकरे यांना मागील काही दिवसांपासून मणका आणि मानेच्या स्नायूंचा त्रास होत आहे.
- त्यासाठी त्यांनी गेल्या सोमवारी गिरगावातील सर एच. एन. रिलायन्स हॉस्पिटलमध्ये आरोग्य तपासणी केली होती.
- तसेच यावेळी त्यांनी काही शारीरिक चाचण्या केल्या होत्या.
- यामध्ये मानेजवळील स्नायू दुखावले गेले असल्याचे समोर आले.
- सुरुवातीला घरीच त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते. पण, तपासणी केली असता डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता.
- अखेर, मुख्यमंत्र्यांनी शस्त्रक्रिया करण्यास होकार दिला आहे.
मान, मणक्याच्या त्रासामुळे भेटीगाठी टाळल्या
- मागील अनेक दिवसांपासून हा त्रास जाणवत असल्यामुळे ठाकरे यांनी भेटीगाठी टाळल्या आहेत.
- त्यांनी दिवाळीनिमित्त सरकारी निवासस्थानी भेट घेणेही टाळले
- प्राथमिक उपचारानंतरही ठाकरे यांचा हा त्रास कमी होत नसल्याची माहिती आहे.
- त्यामुळे पुढील उपचारासाठी मुख्यमंत्र्यांना काही दिवस रुग्णालयात दाखल व्हावे लागण्याची शक्यता आहे.