Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबई ते हैद्राबाद, पुणे ते औरंगाबाद हाय स्पीड रेल्वे मार्गाबाबत मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांना पत्र

September 28, 2021
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
Maha CM-PM Modi

मुक्तपीठ टीम

मुंबई –नाशिक- नागपूर हाय स्पीड रेल्वेच्या कामाला गती देताना राज्य सरकार पूर्ण सहकार्य करेल मात्र याच जोडीने जालना आणि नांदेड मार्गे मुंबई ते हैद्राबाद तसेच पुणे ते औरंगाबाद देखील हाय स्पीड रेल्वेने जोडावेत अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे.

          

मुख्यमंत्री आपल्या पत्रात म्हणतात की, प्रस्तावित मुंबई ते नागपूर हाय स्पीड रेल्वे मार्ग जालन्यापर्यंत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या जोडीनेच जात आहे. राज्य शासनाने जालना ते नांदेड दरम्यान द्रूतगती महामार्ग करण्याचे ठरविले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने यापूर्वीच नांदेड ते हैद्राबाद ही शहरे द्रूतगती महामार्गाने जोडण्याचे ठरविले आहे. त्यामुळे जालना आणि नांदेडमार्गे मुंबई ते हैद्राबाद हा हाय स्पीड रेल्वे मार्ग संयुक्तिक ठरेल.

          

याशिवाय पुणे आणि औरंगाबाद ही शहरे देखील हाय स्पीड रेल्वे मार्गाने जोडावीत म्हणजे केवळ या दोन शहरांनाच नव्हे तर नाशिकलाही त्याचा मोठा फायदा होईल. कारण सध्या मुंबई आणि नागपूर मार्गामुळे मुंबई –नाशिक- औरंगाबाद हे एकमेकाना जोडले जाणार आहेतच. मुंबई ते हैद्राबाद या मार्गामुळे मुंबई आणि पुणे देखील हाय स्पीड ने जोडले जाणार आहेत. याशिवाय राज्य शासनाने पुणे ते नाशिक दरम्यान हाय स्पीड रेल्वेसारखाच मार्ग प्रस्तावित  केला आहे. त्यामुळे ही सगळी शहरे आपोआपच एकमेकांना जोडली जाऊन उद्योग –व्यवसायांना विशेषत: ऑटोमोबाईल उद्योगाला मोठे प्रोत्साहन मिळेल.   


Tags: chief minister uddhav thackeraymumbaiprime minister narendra modiपंतप्रधान नरेंद्र मोदीमुख्यमंत्री उद्धव ठाकरेहाय स्पीड रेल्वे मार्ग
Previous Post

“सारथी तसेच बार्टीच्या विद्यार्थ्यांचे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील यश कौतुकास्पद”

Next Post

राजकीय दौऱ्यावरही जयंत पाटलांनी दाखवले मंत्रीपदाच्या जबाबदारीचं भान

Next Post
jayant patil

राजकीय दौऱ्यावरही जयंत पाटलांनी दाखवले मंत्रीपदाच्या जबाबदारीचं भान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!