मुक्तपीठ टीम
व्हॉट्सअॅपवरील एक मॅसेज…आणि एका रात्रीत शेकडोंचे जीव वाचवणाऱ्या ऑक्सिजनची व्यवस्था झाली. हे घडलंय आपल्या महाराष्ट्रात. ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी हा मॅसेज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवला होता. त्यांनी तात्काळ रिप्लायच दिला, तेही व्यवस्था झाल्याची माहिती देणारा मॅसेजसह!
कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. रोजच पन्नास हजाराच्या आसपास कोरोना संसर्गाची प्रकरणे नोंदवली जात आहेत. यामुळे अनेक गोष्टींचा तुटवडा निर्माण झाला आहे. आता राज्यभरात ऑक्सिजनचा तुटवडा भासू लागला आहे. ठाण्यातही महापालिकेच्या पार्किंग प्लाझा कोरोना सेंटरमध्ये अपुरा ऑक्सिजनचा साठा असल्याने ऑक्सिजन अभावी रुग्णांची गैरसोय होऊ लागली होती. या पाश्वभूमीवर नरेश म्हस्केंनी व्हॉट्सॲपवरुन उद्धव ठाकरेंना ऑक्सिजनच्या तुटवड्याविषयी माहिती दिली असता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाण्यासाठी २४ मेट्रिक टन ऑक्सिजनची व्यवस्था केली.
मुख्यमंत्र्यांनी तासाभरात दहा मेट्रिक टन ऑक्सिजन ठाणे शहराला पुरवण्याची व्यवस्था केली. पुढील काही तासांत उर्वरित १४ मेट्रिक टन ऑक्सिजनही ठाणे शहरात पाठवला जाणार असल्याचेही कळवले. ते कळवणारा अधिकाऱ्यांचा मॅसेजही त्यांनी महापौर नरेश म्हस्के यांना पाठवला.
नेतां संवेदनशील असेल तर १ मेसेज ही पुरतो ,जनतेची गरज समजून घ्यायला
…
आम्हाला तुमचा अभिमान आहे @OfficeofUT pic.twitter.com/fXdgwzwGTk— Naresh Mhaske (@nareshmhaske) April 11, 2021
महापौर – मुख्यमंत्री व्हॉट्सअॅप चॅट
संध्याकाळी ४.०५
महापौर – “साहेब ऑक्सिजन प्रॉब्लेम आहे. आम्हाला खूप गरज आहे आमच्या टीएमसीच्या हॉस्पिटलसाठी. प्रायव्हेट हॉस्पिटलला पण पुरवठा केला जात नाही आहे. काही तरी करा साहेब.. देव आपली किती परीक्षा घेणार साहेब?”
संध्याकाळी ४.०७
“साहेब आमचे जम्बो हॉस्पिटल आता जर टँकर मिळाले नाही तर बंद करावे लागतील. प्लिज काही तरी करा साहेब ”
संध्याकाळी ५.३४
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे – (फॉरवार्डेड – बहुधा अधिकाऱ्याने पाठवलेला) “सर, ठाणे मनपाला एका तासात दहा मेट्रिक टन मिळेल. आज रात्री उशिरापर्यंत १४ मेट्रिक टन मिळेल. मी जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त आणि एफडीए आयुक्तांशी बोललो आहे.”
मुख्यमंत्री बोलले तसे झाले. ठाण्याला ऑक्सिजन मिळाला. त्यानंतर महापौर म्हस्के यांनी मुख्यमंत्र्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारे ट्विट केले, “नेता संवेदनशील असेल तर १ मेसेजही पुरतो ,जनतेची गरज समजून घ्यायला…
आम्हाला तुमचा अभिमान आहे @OfficeofUT”