Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोकणातील चक्रीवादळाचा फटका कमी करणाऱ्या प्रकल्पाला राज्य सरकारची तत्वतः मान्यता

"आपत्ती निवारणासाठी प्राथमिकता ठरवून नियोजन करावे": मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

July 9, 2021
in सरकारी बातम्या
0
CM Thackeray

मुक्तपीठ टीम

राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पाला तत्वतः मान्यता देण्यात आली. तसेच कोरोना च्या उपाययोजनांसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी तरतूद करण्यास मंजूरी देण्यात आली. बदलत्या हवामानामुळे निर्माण होणाऱ्या नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी प्राथमिकता ठरवून नियोजन करण्याची सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी दिली.

 

राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे पार पडली. त्यावेळी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, मुख्य सचिव सिताराम कुंटे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, कोरोना टास्क फोर्सचे डॉ. संजय ओक, डॉ. सुहास प्रभू, डॉ. शंशाक जोशी, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीचे प्रा. रवी सिन्हा, राजेंद्र पवार, डॉ. संजय लाखे पाटील, महेश कांबळे, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, अजित देसाई आदी उपस्थित होते.

 

यावेळी कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पासाठी पाच वर्षात सुमारे ३ हजार ६३५ कोटी रुपये निधी देण्यास मान्यता देण्यात आली. यामध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून २ हजार कोटी तर राज्य शासनाच्या इतर निधीतून १६०० कोटी देण्यात येणार आहेत. तसेच दुष्काळ निवारण कार्यक्रम- पेंच प्रकल्प नागपूर हा प्रकल्पाच्या मंजुरीसाठी मंत्रीमंडळ बैठकीत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

 

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, नैसर्गिक आपत्तीमुळे जिवीत हानी होऊ नये, यासाठी कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पात सुचविलेल्या उपाययोजना ठरविताना प्राधान्यक्रम ठरविण्यात यावेत. बहुउद्देशीय चक्रीवादळ निवारे बांधणे, धूप प्रतिबंधक बंधारे बांधणे, वीज अटकाव यंत्रणा बसविणे या उपाययोजनांची प्राथमिकता ठरवून कामे सुरू करण्यात यावीत.

 

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, कोरोन ही आरोग्यविषयक जागतिक आपत्ती आहे. अद्याप अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्गाची चिंताजनक स्थिती आहे. तर काही ठिकाणी कोरोनाचे नवीन विषाणू दिसून येत आहेत. पुढील काळात हा संसर्ग वाढू नये, यासाठी टास्क फोर्सच्या मदतीने नियोजन करण्यात यावे. कोरोना उपाययोजनांसाठी राज्यशासन निधी कमी पडू देणार नाही. जगभरात तिसऱ्या लाटेची चर्चा आहे. कोरोना लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेल्यांची चाचणी करावी का, बुस्टर डोस घ्यावा का याबद्दल चर्चा सुरू आहे. याबरोबरच निर्बंध शिथिल करण्याचीही मागणी होत आहे. आर्थिक गाडा सुरु करण्यासाठी राज्य शासनाने विविध उद्योजकांबरोबर चर्चा करून कोरोना प्रोटोकॉल पाळून कामे सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. हात धुणे, मास्क वापरणे व योग्य अंतर राखणे या उपाययोजनांवर भर देऊन कामे सुरू करण्याच्या सूचना उद्योजकांना केल्या आहेत. त्याचबरोबर उद्योग परिसरात कामगारांची राहण्याची तयारी करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. त्यासाठी राज्यशासन मदत करण्यास तयार आहे, असेही ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

 

वडेट्टीवार म्हणाले की, कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पासाठी निधी दिल्यामुळे चक्रीवादळामुळे होणारे नुकसान कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच कोकणाबरोबरच मराठवाड्यात सुद्धा वीज अटकाव यंत्रणा बसविण्यात यावी. आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात माहिती मिळावी, अद्ययावत यंत्रणा असावी, यासाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्थेची स्थापना करणे आवश्यक आहे. तसेच राज्य आपत्ती निवारण दलाच्या प्रशिक्षण केंद्रास मान्यता मिळावी.

 

गुप्ता यांनी सांगितले की, विविध आपत्तीमध्ये मदतीसाठी मागील वर्षात सुमारे ६ हजार २६९ कोटी खर्च करण्यात आले आहेत. कोवीड उपाययोजनांसाठी २०२०-२१ मध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून ८६२ कोटी निधी देण्यात आला आहे. केंद्र शासनाने राज्य आपत्ती प्रतिसाद व्यवस्थापन निधीचे नाव बदलून राज्य आपत्ती निवारण धोके व्यवस्थापन निधी असे केले असून त्याची नवीन कार्यपद्धती तयार केली आहे. या कार्यपद्धतीनुसार पुढील पाच वर्षाचा कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. तसेच अवेळी पाऊस, दुष्काळ यामध्ये मदत देण्यासंदर्भात नवीन कार्यपद्धती व व्याख्या निश्चित करण्यात येत आहे. तसेच शेती पिकांच्या पंचनाम्यासाठी ॲप तयार करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

टास्कफोर्सचे सदस्य डॉ. ओक म्हणाले की, कोरोना आपत्ती ही पहिल्यांदाच सर्व जग अनुभवत आहे. यापुढील काळात नवीन व्हेरियंट येण्याची शक्यता असल्याने त्याच्याशी मुकाबला करण्यासाठी निधीची आवश्यकता लागणार आहे. तसेच कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी लसीकरण, औषधे व चाचण्यांसाठीही निधी उपलब्ध करावा लागेल.

 

यावेळी डॉ. शंशाक जोशी, महेश कांबळे, सुहास प्रभू, राजेंद्र पवार आदींनी यावेळी मते मांडली.


Tags: chief minister uddhav thackerayMinister Vijay wadettiwarकोरोना संसंर्गमुख्यमंत्री उद्धव ठाकरेविजय वडेट्टीवार
Previous Post

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका स्थगित

Next Post

राज्यात ४८ तासात १५८ मृत्यू, साडेदहा हजार रुग्ण बरे झाले! आठ जिल्ह्यांमध्ये एकेरी नवे रुग्ण!

Next Post
MCR 1-5-21

राज्यात ४८ तासात १५८ मृत्यू, साडेदहा हजार रुग्ण बरे झाले! आठ जिल्ह्यांमध्ये एकेरी नवे रुग्ण!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!