Sunday, June 1, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाराष्ट्राला परदेशातून कोरोनाच्या नव्या संसर्गाचा व्हाया परराज्य धोका!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जारी केला दुसऱ्या कोरोना लाटेसाठी अलर्ट!

February 8, 2021
in आरोग्य, घडलं-बिघडलं
0
Uddhav Thackeray 5-2-21 -1

मुक्तपीठ टीम

कोविडचे लसीकरण वेगाने सुरु आहे परंतु ब्रिटन, ब्राझीलमध्ये ज्या पद्धतीने कोरोनाचा संसर्ग फैलावत आहे आणि मृत्यू होत आहेत ते पाहता आपण बेसावध न राहता अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोना सादरीकरणाच्यावेळी सांगितले. श्री.ठाकरे म्हणाले की समूह प्रतिकारशक्ती म्हण  हर्ड इम्युनिटीमुळे) मुळे आपल्याकडे लक्षणीयरित्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे, असे जर आपण मानत असू तर अशाच प्रकारे समूह प्रतिकारशक्तीनंतर देखील युरोपमध्ये संसर्गाची दुसरी जोरदार लाट आलेली दिसते हे लक्षात घ्यावे असेही मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी सांगितले. अजूनही परदेशातून येणारे प्रवासी अन्य मार्गाने थेट महाराष्ट्रात पोहचत आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. त्यांना त्या त्या विमानतळांच्या शहरांमध्येच विलगीकरणात ठेवण्याची मागणी ते केंद्र सरकारकडे करणार आहेत.

 

दुसऱ्या लाटेविषयी मुख्यमंत्री ठाकरे काय बोलले?

  • सध्या चीनमधून पसरलेल्या मूळ विषाणूव्यतिरिक्त ब्राझिलियन, आफ्रिकन, युके असे या विषाणूचे तीन आणखी स्ट्रेन असून आपल्याकडे ते पसरू नयेत म्हणून अधिक दक्षता घ्यावी लागेल व जागरूकता बाळगावी लागेल.
  • दुसरी लाट येऊ नये म्हणून आपण लसीकरण सुरु असले तरी आरोग्याचे नियम पाळत राहिले पाहिजे.
  • केंद्राने जरी चित्रपटगृहे व इतर काही बाबतीत निर्बंध बऱ्यापैकी शिथिल केले असले आणि महाराष्ट्रात देखील आपण आता बऱ्यापैकी व्यवहार सुरु केले असले तरी आपण महाराष्ट्रात सरसकट सगळे निर्बंध उठविणार नसून काळजीपूर्वक पुढे जाणार असल्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले.

 

महाराष्ट्राला परदेशी संसर्गाचा व्हाया परराज्य धोका

अजूनही परदेशातून येणारे प्रवासी अन्य मार्गाने थेट महाराष्ट्रात पोहचत आहेत, याबाबत केंद्राशी पत्रव्यवहार केला आहे पण आणखी एकदा विनंती करून प्रदेशातून येणाऱ्या प्रवाशांना ते उतरतील त्या विमानतळाच्या शहरातच विलगीकरणात ठेवावे असे सांगणार असल्याचेही श्री.ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी परराज्यांमधून विलगीकरणात न जाताच थेट महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांमुळे महाराष्ट्रात धोका निर्माण होण्याच्या समस्येकडे योग्य वेळी लक्ष वेधले आहे. अशाप्रकारे परदेशातून आलेल्यांना थेट महाराष्ट्रातच नाही तर अन्यत्रही जाऊ न देऊ नये. त्या विमानतळाच्या शहरांमध्येच परदेशातून आलेल्यांचे विलगीकरण आवश्यक असल्याचे मत वन रुपी क्लिनिकचे डॉ. राहुल घुले यांनीहीअजूनही परदेशातून येणारे प्रवासी अन्य मार्गाने थेट महाराष्ट्रात पोहचत आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. त्यांना त्या त्या विमानतळांच्या शहरांमध्येच विलगीकरणात ठेवण्याची मागणी ते केंद्र सरकारकडे करणार आहेत. व्यक्त केले आहे.

दुसऱ्या स्ट्रेनमुळे मृत्यूचे प्रमाण अधिक

आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी माहिती देताना कोरोना दुसऱ्या लाटेचा जास्त घातकीपणा लक्षात आणून दिला:

  • इंग्लंडमध्ये २० जानेवारी या एकाच दिवशी १८२० मृत्यू झाले
  • ब्राझिलमध्ये दररोज १ हजार मृत्यू होत आहेत.
  • ब्राझिलमध्ये दररोज ५० हजार रुग्ण आढळत आहेत.
  • जून -जुलैनंतर या देशांत समूह प्रतिकारशक्ती येऊन रुग्णांची संख्या अतिशय कमी झाली होती.
  • पण चार पाच महिन्यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या स्ट्रेनचा संसर्ग आढळला जो की ७० टक्के संसर्ग जास्त पसरविण्याची क्षमता असलेला होता.
  • नुकत्याच केलेल्या पाहणीत हा स्ट्रेन केवळ संसर्ग वेगाने पसरविण्यातच नव्हे तर ४० टक्के जास्त मृत्यू यामुळे होऊ शकतात इतका धोकादायक आहे.

 

महाराष्ट्रात साडेतीन लाख जणांना लसीकरण

आत्तापर्यंत महाराष्ट्राला १८ लाख २ हजार कोव्हीशिल्ड, तर १ लाख ७० हजार ४०० कोव्हॅक्सिन अशा १९ लाख ७२ हजार ४०० लसी प्राप्त झाल्या आहेत. आजपर्यंत ३ लाख ५४ हजार ६३३ जणांना लस देण्यात आली आहे. त्यात ३ लाख ५१ हजार ४८ कोव्हीशिल्ड तर ३ हजार ५४५ कोव्हॅक्सिन लसी आहेत अशी माहिती देण्यात आली. कालपासून फ्रंटलाईन वर्कर्सना लस देणे सुरु झाल्याचेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील मृत्यूदर कमी झाला

राज्याचा मृत्यू दर नोव्हेंबरमध्ये २.२६, डिसेंबर मध्ये १.९६ आणि जानेवारीत १.६३ टक्के इतका झाल्याची तसेच  साप्ताहिक पॉझिटीव्हीटी दर ४.५१ टक्के असल्याची माहितीही त्यांनी दिली.

 

काही जिल्ह्यांवर अधिक लक्ष ठेवणार

कोविडचा आलेख घसरता असला तरी अमरावती, यवतमाळ, अकोला, भंडारा , नंदुरबार, वर्धा, रत्नागिरी, गडचिरोली, नांदेड या जिल्ह्यांमध्ये साप्ताहिक रुग्णवाढीचा वेग जास्त आहे तसेच चाचण्यांचे प्रमाणही कमी आहे त्यामुळे त्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

मुंबईच्या लोकल सेवेत ३४ लाख प्रवाशी

लोकल सर्वांसाठी सुरु केल्यावर २० लाख प्रवासी मध्य रेल्वेवर तर १४ लाख प्रवासी पश्चिम रेल्वेवर नोंदवले गेले अशी माहिती मदत व पुनर्वसन प्रधान सचिव असीम गुप्ता यांनी यावेळी दिली. विवाह समारंभ, अंत्यसंस्कार यांना  केंद्र सरकारने १०० जणांची उपस्थितीस परवानगी दिली असली तरी आपल्याकडे अजूनही ५० जणांची उपस्थिती तर अंत्यसंस्कारासाठी अजूनही २० जणांनाच परवानगी आहे त्याचप्रमाणे १५ फेब्रुवारीपासून महाविद्यालये ७५ टक्के उपस्थितीच्या अटींशिवाय सुरु करण्यात येणार असल्याची माहितीही डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.


Tags: 2nd wavechief minister uddhav thackeraycm uddhav thackeraycoronacovid-19उद्धव ठाकरेकोरोनाकोरोना दुसरी लाटमुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Previous Post

कॅाटन कॅार्पोरेशनमध्ये अप्रेंटिसशिपची संधी, ४८२ पदांसाठी अर्ज मागवले

Next Post

पंडित भीमसेन जोशी पुरस्कार मिळालेल्या डॉ. एन. राजम यांच्या विषयी सर्व काही…

Next Post
n rajam

पंडित भीमसेन जोशी पुरस्कार मिळालेल्या डॉ. एन. राजम यांच्या विषयी सर्व काही...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!