Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबई महानगर क्षेत्रात (एमएमआर) हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

November 29, 2022
in व्हा अभिव्यक्त!
0
मा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुक्तपीठ टीम

मुंबई हे जागतिक दर्जाचे स्वच्छ आणि सुंदर शहर व्हावे म्हणून भक्कमपणे पावले उचलली असून रस्ते, चौक, पदपथ, वाहतूक बेटं, उड्डाणपूल यांचे सुशोभीकरण केले जात आहे. मुंबईप्रमाणेच महानगर क्षेत्रात (एमएमआर) हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना पुढच्या टप्प्यात सुरू होणार असल्याची माहिती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली.            

‘मुंबई फर्स्ट’ संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत मुंबई सुशोभीकरण, आरोग्य व्यवस्था, पायाभूत सुविधांचे प्रकल्प आदीबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी ‘मुंबई फर्स्ट’ संस्थेचे नरींदर नायर, संजय उबाळे, अशांक देसाई, नेवील मेहता, अश्व‍िनी ठाकूर आदी पदाधिकारी उपस्थित होते.            

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले, मुंबई हे जगातील सर्वांत सुंदर शहर करण्याचा आमचा मानस असून त्यादृष्टीने कामाला सुरूवात केली आहे. मुंबईतील रस्त्यांचे काँक्रीटीकरण केले जाणार असून त्यामुळे खड्डेविरहीत रस्ते ही संकल्पना साकारली जाणार आहे. मुंबईतील वर्दळीच्या ठिकाणी चौक, रस्ते, पदपथ, उड्डाणपूल यांच्या सुशोभीकरणाला सुरूवात झाली आहे.            

कोळीवाड्यांचे सुशोभीकरण केले जात असून त्यांच्या स्वच्छतेवर भर दिला जात आहे. पर्यटनाच्यादृष्टीने कोळीवाड्यांचा विकास केला जात असून  तेथील खाद्यसंकृतीची ओळख पर्यटकांना होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मुंबईत २२७ ठिकाणी आपला दवाखाना सुरू करण्यात येणार असून त्या माध्यमातून सामान्यांना मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी आपला दवाखाना उपक्रमाचे मुंबई फर्स्ट संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले. मुंबईमध्ये ग्लोबल वॉर्मिंग, बदलती शहरे, वातावरणीय बदल यावर आंतरराष्ट्रीय परिसंवाद घेण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.


Tags: MMR Regionएमएमआरमुंबई महानगर क्षेत्रहिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे
Previous Post

मुख्यम वैद्यकीय सहायता निधीतून आर्थिक मदतीसाठी मंजुरीची प्रक्रिया जलदगतीने व्हावी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

Next Post

विमानतळांच्या धावपट्ट्यांचे विस्तारीकरण करतानाच प्रत्येक तालुक्यात हेलिपॅड करावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post
महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची ८१ वी संचालक मंडळाची बैठक 1

विमानतळांच्या धावपट्ट्यांचे विस्तारीकरण करतानाच प्रत्येक तालुक्यात हेलिपॅड करावे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!