मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रातील काही भागात जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे. कोकण, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा तडाखा बसला आहे. याचबरोबर गडचिरोलीत मुसळधार पावसामुळे नदी, नाले आणि ओढ्यांना पूर आला आहे. पुढील २ दिवस गडचिरोलीत रेड अलर्ट देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तात्काळ गडचिरोलीत दाखल होणार आहेत. ते गेल्या सरकारमध्ये गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री होते. आता मुख्यमंत्री झाल्यावरही ते पालकत्व विसरलेले नाहीत, अशी चर्चा जिल्ह्यात सुरु आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पूरस्थितीचा आढावा!!
- शपथविधी होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोड मध्ये आले आहेत.
- गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.
- त्यामुळे पूर स्थिती निर्माण झाली आहे.
- पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रवाना झाले आहेत.
- दुपारी चार वाजता एकनाथ शिंदे हे अतिवृष्टी आणि पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा करणार आहेत.
- त्यानंतर संध्याकाळी ६.३० वाजता पूर परिस्थितीबाबत गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासन सोबत आढावा बैठक घेणार आहेत.
गडचिरोलीत पावसाचा कहर!!
- गडचिरोलीला पावसाचा जोरदार तडाखा बसलाय.
- मुसळधार पावसामुळे गडचिरोलीतील नदी, नाले आणि ओढ्यांना पूर आला आहे.
- काही ठिकाणी गावात पाणी शिरल्याच्या घटना देखील घडल्या आहेत.
- पुढील २ दिवस गडचिरोलीत रेड अलर्ट देण्यात आला आहे.
- याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून खबरदारीचे उपाय करण्यात येतायत.
- पुढील ३ दिवस शाळा आणि कॉलेजला सुट्टी देण्यात आली आहे.
- तसेच अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकानं बंद राहणार आहेत.
- मात्र शासकीय कार्यालयं सुरु राहणार आहेत.
- तसेच NDRF ची टीम आणि SDRF च्या टीमला देखील सूचना देण्यात आल्या आहेत.