Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

वरळी-शिवडी उन्नत मार्ग बाधितांना न्याय देण्यासाठी उपाययोजना करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

September 25, 2022
in सरकारी बातम्या
0
Eknath shinde..

मुक्तपीठ टीम

‘विकास कामे करताना स्थानिकांना भकास करून चालणार नाही. त्यामुळे वरळी- शिवडी उन्नत मार्ग प्रकल्प बाधितांच्या सर्व अडचणी समजून घेऊन, त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न केले जातील. त्यावर उपाययोजना केल्या जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले.

वरळी- शिवडी उन्नत मार्ग प्रकल्पामध्ये बाधित होणाऱ्या प्रभादेवी परिसरातील कामगार नगर १ व २ आणि गणेशनगर या भागाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली. पाहणीनंतर ते उपस्थित नागरिकांशी बोलत होते.

याप्रसंगी खासदार राहुल शेवाळे आमदार सर्वश्री सदा सरवणकर, कालिदास कोळंबकर,  मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवासन यांच्यासह मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी तसेच प्रकल्प अभियंता, अधिकारी आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले,वरळी- शिवडी उन्नत मार्ग प्रकल्प बाधितांच्या अडचणी समजून घेण्यासाठी आज जाणीवपूर्वक हा पाहणी दौरा केला. गेली काही वर्षे या रहिवाशांच्या संक्रमण शिबिर, घरांचे भाडे, पुनर्वसन आणि पुनर्विकास यांच्याशी निगडित अडचणी प्रलंबित आहेत. त्याबाबत लवकरच मंत्रालयात बैठक घेऊन संबंधित सर्व विभागांच्या समन्वयाने उपाययोजना केल्या जातील. झोपडपट्टी पुनर्वसन आणि प्रकल्प, योजना रेंगाळू नयेत यासाठी प्रयत्नशील आहोत. यात केंद्र आणि राज्य मिळून पुनर्विकासाबाबत एकत्रित आणि समन्वयाने प्रयत्न करु. स्थानिक नागरिकांच्या विकासासाठी आवश्यक ते सर्व पाठबळ उभे करू, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी या रहिवाशांच्या अडचणींवर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. यात सेंच्युरी मिल येथील संक्रमण शिबिरात व्यवस्था, तातडीने भाडे देणे याबाबत नियोजन करण्याच्या सूचना दिल्या.

तत्पूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरळी-शिवडी उन्नत मार्ग प्रकल्पाच्या कामांची पाहणी केली. विशेषतः प्रकल्पात बाधित होणाऱ्या स्थानिक रहिवाशांशी आस्थेवाईकपणे संवाद साधला. त्यांचे म्हणणे जाणून घेतले.


Tags: CMEknath Shindeमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवरळी-शिवडी उन्नत मार्गवरळी-शिवडी उन्नत मार्ग बाधित
Previous Post

महाराष्ट्रातील एक कार्यक्रम अधिकारी आणि दोन विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार प्रदान

Next Post

“वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प गमावण्यास उद्धव ठाकरेच जबाबदार, आदित्य यांचे आंदोलन खोटारडे”

Next Post
Uddhav Thackeray Bawankule And aditya

"वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प गमावण्यास उद्धव ठाकरेच जबाबदार, आदित्य यांचे आंदोलन खोटारडे"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!