Sunday, June 8, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘नंदनवन’ सोडून मुख्यमंत्री शिंदे अखेर ‘वर्षा’वर जाणार…नावाची पाटी झळकली!

August 5, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Cm Eknath Shinde Will Stay At Varsha Bungalow

मुक्तपीठ टीम

एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वर्षा बंगला सोडावा लागला होता. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, अद्याप शिंदे हे मुख्यमंत्र्यासाठी असलेल्या वर्षा बंगल्यावर राहण्यासाठीही गेले नाहीत. दरम्यान आता एकनाथ शिंदे यांच्या नावाची पाटी वर्षा निवासस्थानी लागली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे वर्षा निवासस्थानी राहण्यासाठी जाणार असल्याती शक्यता वर्तवली जात आहे.

वर्षा बंगल्यावर एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी!!

  • एकनाथ शिंदे यांनी ३० जून रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
  • तरीही त्यांनी ‘नंदनवन’वरून आपला मुक्काम हलवला नाही.
  • शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यभरातील नेते, खासदार, आमदार, कार्यकर्ते त्यांच्या भेटीसाठी येत आहेत.
  • त्यामुळे हा बंगला अपुरा पडू लागला आहे. शिवाय मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ‘नंदनवन’ हा पोलिसांसाठी गैरसोयीचा आहे.
  • मुख्यमंत्र्यांचा राजशिष्टाचार लक्षात घेऊन शिंदे यांनी ‘वर्षा’वर मुक्कामाला यावे, अशी विनंती त्यांना करण्यात आली होती.
  • अखेर एक महिन्यानंतर वर्षा बंगल्याला एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी लावली गेलीय.
  • तसेच वर्षा बंगल्याची रंगरंगोटी देखील पुर्ण झाल्याची माहिती तिथल्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे.

२०१४ पासून एकनाथ शिंदे ‘नंदनवन’ बंगल्यात राहतात!!

  • एकनाथ शिंदे जरी वर्षावर राहायला गेले तरी ते ‘नंदनवन’ या सरकारी बंगल्याचा ताबा मात्र कायम ठेवणार असल्याचे कळते.
  • एकनाथ शिंदे २०१४ पासून मलबार येथील नंदनवन या शासकीय निवासस्थानातून आपला कारभार चालवत आले आहेत.
  • गेल्या सात-साडेसात वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत शिंदे यांच्यासाठी ‘नंदनवन’ बंगला अतिशय फलदायी ठरल्याचे बोलले जाते.
  • शिंदे हे वर्षावर जाणार असले तरी सुरूवातीचे काही महिने ते वर्षा बंगल्यावर केवळ सरकारी कामकाज करतील, बैठका घेतील अशी खात्रिलायक माहिती आहे.

Tags: Eknath ShindeMaharashtraNandanvanShivsenaVarsha Bungalowएकनाथ शिंदेनंदनवनवर्षा बंगलाशिवसेना
Previous Post

मुख्यमंत्री शिंदेंचं आज संध्याकाळी ७ वाजता समर्थक आमदारांना प्रिती भोजन!

Next Post

संजय राऊत अटक, गांधी आक्रमक, पण पवार शांत…असं कसं?

Next Post
Sanjay Raut and Sharad Pawar

संजय राऊत अटक, गांधी आक्रमक, पण पवार शांत...असं कसं?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!