Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दौरा, आदित्य ठाकरे गेले त्या जिल्ह्यांमध्ये जाणार!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
cm eknath shinde tour to counter aaditya thackeray tour

मुक्तपीठ टीम

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून नाशिकमधून आपल्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शिंदे यांच्या पहिल्याच दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान नुकत्याच झालेल्या युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेला चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. आदित्य ठाकरे यांनी नाशिक, अहमदनगर, औरंगाबादसह काही जिल्ह्यांचा दौरा केला होता यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांवर कडाडून टीका केली होती. आता त्याच जिल्ह्यांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही मोठी मोहीम सुरू करणार आहेत.

आदित्य ठाकरे यांच्या संवाद यात्रेचा पहिला टप्पा भिवंडीतून सुरू होऊन शिर्डीत संपला. यामध्ये नाशिक, औरंगाबाद आणि अहमदनगर जिल्ह्यांचाही समावेश आहे. आता त्यांचा सावंतवाडी आणि कोल्हापूरचा पुढील दौरा १ ऑगस्टपासून सुरू होत आहे. विशेष म्हणजे या भेटीदरम्यान आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर टीका केली होती. येथे शिंदेही बंडखोर आमदारांच्या विभागात सभा घेणार आहेत.

२९ जुलैपासून सुरू होणाऱ्या यात्रेदरम्यान मुख्यमंत्री शिंदे नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये अनेक प्रकल्पांचे लोकार्पण करणार आहेत. त्याचबरोबर यानंतर पत्रकार परिषदही घेणार आहेत. या दौऱ्याला राजकीय पार्श्वभूमी असल्याचं बोललं जात आहे. मुख्यमंत्री नाशिकऐवजी थेट मालेगाव तालुक्याचा नियोजित दौरा करणार आहेत. शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे, दादा भुसे आणि सुहास कांदे हे आमदार शिंदे गटात सामील झाल्यानंतर नाशिकमध्ये शिवसेना कमकुवत झाल्याचे चित्र आहे. यामुळे आदित्य ठाकरे यांनी मालेगाव दौरा केला. आदित्य ठाकरे यांनी तर तिन्ही बंडखोरांवर चांगलीच टीका केली. त्यामुळे दादा भुसे आणि सुहास कांदे यांना बळ देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट मालेगावात येणार आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांची आढावा बैठक होणार आहे. यानंतर ते अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघात जाऊन अनेक विकासकामांचा शुभारंभ करणार आहेत. येथे ते एका जाहीर सभेला उपस्थित राहणार आहेत. यानंतर ते औरंगाबाद मध्यचे आमदार प्रदीप जैस्वाल, औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट, संदीपान भुमरे यांची कार्यालयांना भेट देतील. आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल सावे यांची भेट घेण्यासाठी मुंबईला रवाना होतील.


Tags: aditya thackerayEknath ShindeMaharashtra RallyMalegaonShivsenaआदित्य ठाकरेएकनाथ शिंदेमहाराष्ट्र दौरामालेगावशिवसेना
Previous Post

शिवसेनेला नवं टेन्शन, मुख्यमंत्र्यांचंही मुंबई मिशन!

Next Post

आरे कारशेडमध्ये काय चाललंय? मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे निवेदन…

Next Post
metro rail corporation on aarey metro car shade

आरे कारशेडमध्ये काय चाललंय? मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे निवेदन...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!