मुक्तपीठ टीम
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला मिळालेल्या मशाल या चिन्हावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरली आहे. ते म्हणालेत, “मशाली अन्यायाविरोधात पेटल्या पाहिजेत! महाराजांच्या काळातही अन्यायाविरोधात मशाली पेटवल्या होत्या!” त्यानंतर त्यांनी आपला पक्ष अन्यायाविरोधातील सरकार असल्याचे प्रतिपादन केले. त्यांच्या प्रतिक्रियेतून अप्रत्यक्षरीत्या
नाव आणि चिन्हांवर काय म्हणालेत मुख्यमंत्री शिंदे?
- बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आम्ही भूमिका घेतली होती.
- निवडणूक आयोगाने आम्हाला बाळासाहेबांची शिवसेना म्हणून मान्यता दिली आहे.
- त्यांना धन्यवाद देतो. आमच्या नेत्या-पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो.
- आम्ही ३ नावे दिली होती. आयोगाने ती रद्द केली. आम्ही नवी नावे देऊ. आम्हालाही चिन्ह मिळेल.
मशाली अन्यायाविरोधात पेटल्या पाहिजेत!
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही अन्यायाविरोधात मशाली पेटवल्या होत्या!आपण त्या पाहिल्या होत्या.
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ठाकरेंच्या शिवसेनेच्या मशाल चिन्हावर प्रतिक्रिया
- आम्ही अन्याय दूर करणारा पक्ष आहे. हा राज्यातील जनतेचा पक्ष आहे. जनतेचं सरकार आहे. त्यामुळे या सरकारमध्ये सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यामध्ये, जीवनामध्ये काय बदल घडू शकतो, ते आम्ही पाहणार आहोत.
- त्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. मग शेतकरी, महिला, कष्टकरी, विद्यार्थी त्यांच्या जीवनात कसा बदल होईल, सुख-समाधान कसे मिळेल,
- आमचं सरकार अन्याय दूर करणारं सरकार आहे.