Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर एकदाच बोलणार एकनाथ शिंदे…”पालापाचोळ्यानेच इतिहास घडवलाय!”

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Cm Eknath Shinde Answer Allegations Uddhav Thackeray In Interview

मुक्तपीठ टीम

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीच्या पहिल्या भागात एकनाथ शिंदेंच्या बंडावर भाष्य केलं आहे. या मुलाखतीच्या दुसऱ्या भागात त्यांनी एकनाथ शिंदेंना गद्दार नाही तर आता विश्वासघातकी म्हणतो, असं सुनावलं आहे. पहिल्या भागातही एकनाथ शिंदे यांचं नाव एकदाही न घेता उद्धव ठाकरेंनी अनेकदा शिंदेंचा उल्लेख ‘पालापाचोळा’ असा केला. या विधानावर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. या पालापाचोळ्यानेच इतिहास घडवला आहे. हे जनतेला माहिती आहे, असे ते म्हणाले.

पालापाचोळ्यानेच इतिहास घडवला आहे!!

  • एकनाथ शिंदे म्हणाले, त्यांना आणखी काही बोलायचं आहे ते बोलून होऊ द्या.
  • पूर्ण बोलून झालं की मग मी एकत्रित त्यावर बोलन.
  • त्यांना वाटतं आम्ही पालापाचोळा आहे, पण या पालापाचोळ्यानेच इतिहास घडवला आहे.
  • हे जनतेला माहिती आहे.
  • इतिहास घडवणारे कोण असतात हे लोकांनी पाहिलं आहे.
  • आमची लढाई सत्तेसाठी नाही.
  • आमची लढाई शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांसाठी होती.
  • त्यातूनच आम्ही ही भूमिका घेतली आहे.
  • त्यामुळे पालापाचोळा, पानगळ जे म्हणायचं आहे तो त्यांचा अधिकार आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे ?

  • खरं सांगायचं तर मला चिंता नाहीये.
  • चिंता माझी नाहीये, शिवसेनेची तर बिलकूल नाहीये.
  • मात्र थोडीफार चिंता आहे ती नक्कीच मराठी माणसांची, हिंदूंची आणि हिंदुत्वाची आहे.
  • याचं कारण हिंदुद्वेष्टे, मराठीद्वेष्टे हे आपल्या घरातच आहेत. मराठी माणसांची एकजूट तुटावी, हिंदूंमध्ये फूट पडावी आणि मराठी माणसाची, हिंदूंची एकजूट करण्यासाठी जी मेहनत माननीय शिवसेनाप्रमुखांनी हयातभर केली ती आपल्याच काही कपाळकरंट्याच्या हातून तोडावी, मोडावी असा हा प्रयत्न केला जातोय याची मला चिंता आहे.
  • म्हणून मी जे म्हटलं की, हा पालापाचोळा सध्या उडतोय; तो उडू द्या.
  • इकडून पालापाचोळा तिकडे जातोय, जी पानं गळणं गरजेची होती ती पानं उडतात.
  • म्हणजे नवी पालवी फुटेल.

Tags: BJPEknath ShindeSaamana InterviewShivsenaUddhav Thackerayउद्धव ठाकरेएकनाथ शिंदेभाजपाशिवसेनासामना मुलाखत
Previous Post

औषधी, वैद्यकीय उपकरणे खरेदीला स्थगिती आदेश लागू नाही

Next Post

#मुक्तपीठ #LiVE ईडीची दहशत! ईडीचा वापर महाराष्ट्रात सरकार पाडण्यासाठी! पण मंत्रिमंडळ बनवण्यासाठी झाला नाही- काँग्रेस

Next Post
#मुक्तपीठ #LiVE  ईडीची दहशत! ईडीचा वापर महाराष्ट्रात सरकार पाडण्यासाठी! पण मंत्रिमंडळ बनवण्यासाठी झाला नाही- काँग्रेस

#मुक्तपीठ #LiVE ईडीची दहशत! ईडीचा वापर महाराष्ट्रात सरकार पाडण्यासाठी! पण मंत्रिमंडळ बनवण्यासाठी झाला नाही- काँग्रेस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!