Saturday, May 10, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home चांगल्या बातम्या सरकारी बातम्या

विकासकामांसाठी शासन पाठीशी, जनहिताची कामे थांबणार नाहीत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 3, 2022
in सरकारी बातम्या
0
विकासकामांसाठी शासन पाठीशी, जनहिताची कामे थांबणार नाहीत- मुख्यमंत्री एकनाथ शिेंदे (1)

मुक्तपीठ टीम

पुणे विभागातील जनहिताच्या विकासकामांसाठी कोणत्याही प्रकारे निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. जनतेच्या कामांसाठी क्रियान्वयनातील टप्पे कमी करून विकासकामे वेगाने पूर्ण करावी. विकासकामांसाठी प्रशासनाला शासनाचे सर्वतोपरी सहकार्य राहील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात पाऊस, अतिवृष्टी, पीक पाहणी आणि विकासकामांबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस खासदार श्रीरंग बारणे, विभागीय आयुक्त सौरभ राव, विविध विभागांचे राज्य आणि विभागस्तरीय अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, पूरग्रस्त भागातील नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम त्वरित पूर्ण करावे. शासनाच्या मदतीपासून कुणीही वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. दरडप्रवण गावातील तात्पुरते स्थलांतर केलेल्या नागरिकांना सर्व प्रकारच्या मूलभूत सुविधा देण्यात याव्यात. प्राणहानी व घरांच्या नुकसानीची भरपाई देण्याबाबत आवश्यक निधीची मागणी करण्यात यावी, असे त्यांनी सांगितले.

पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करा

मुख्यमंत्र्यांनी विभागातील पेरणी, पीक कर्जवाटप, बी – बियाणे आणि खतांची उपलब्धता याचाही आढावा घेतला. कृषि निविष्ठांची कमतरता भासू देऊ नये आणि निकृष्ट बियाण्यांच्या बाबतीत विशेष लक्ष ठेवावे. पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट पूर्ण होईल, याकडेही लक्ष द्यावे. पीक विमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांना वेळेवर मिळावा यासाठी विमा कंपन्यांना सूचना देण्यात याव्या. पीक कर्ज वाटपाचे प्रमाण वाढविण्यासाठी जिल्हा आणि विभाग स्तरावर बैठका घेण्यात याव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले.

कोरोना वर्धक मात्रेबाबत जनप्रबोधन करा

मुख्यमंत्र्यांनी विभागातील कोविड परिस्थितीचा आढावा घेतला. कोरोनाची वर्धित मात्रा घेण्यासाठी नागरिकांच्या प्रबोधनावर भर द्यावा आणि व्यापक प्रमाणात सर्व माध्यमांद्वारे जनजागृती करण्यात यावी. येणाऱ्या सण – उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालयात लसीकरण शिबिरांचे आयोजित करावे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७५ दिवस लसीकरण कार्यक्रमांतर्गत लसीकरणाचे प्रमाण वाढवावे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून लसीकरणासाठी विशेष मोहीम राबवावी. पावसाळ्यातील आजार, डेंग्यू, मंकीपॉक्स आदी आजाराबाबत दक्षता घ्यावी, असे निर्देश एकनाथ शिंदे यांनी दिले.

वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी योग्य नियोजन करा

बैठकीत विभागातील विकासकामांचा आढावा घेण्यात आला. पुणे रिंगरोडसाठी आवश्यक भू संपादनाच्या कामाला गती द्यावी. भू संपादनातील वादाचे मुद्दे लोकअदालतीच्या माध्यमातून सामोपचाराने सोडवावेत. वाहतुकीचे नियोजन करताना रिंगरोडला जोडणाऱ्या मिसिंग लिंकचा समावेश करावा. पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आवश्यक नियोजन करावे. रस्त्यावरील खड्डे भरताना तात्पुरते काम न करता नव्या तंत्रज्ञानाचा वापर करावा. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील एकात्मिक वाहतूक आराखड्याबाबत एकत्रित बैठक मुंबई येथे आयोजित करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

केंद्र पुरस्कृत योजनांना गती द्यावी

प्रधानमंत्री आवास योजनेचे उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण करावे. राज्य आणि केंद्रशासनाच्या योजनांचा आढावा विभागीय आयुक्त स्तरावर घेण्यात यावा. राज्यातील विविध योजनांसाठी केंद्र सरकार निधी देण्यास तयार आहे. केंद्र सरकारकडे प्रलंबित बाबी मार्गी लागण्यासाठी राज्य शासन आवश्यक पाठपुरावा करेल. अशा विकास योजनांच्या कामाला गती देण्यात यावी.

धार्मिक स्थळांच्या ठिकाणी भाविकांना आवश्यक सुविधा द्याव्यात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पर्यटन आणि धार्मिक स्थळ विकासकामांचा आढावा घेतला. पंढरपूरचा विशेष विकास आराखडा तयार करावा. रस्ते, पदपथ, स्वच्छतागृह, स्नानगृह अशा सर्व उत्तम सुविधांचा त्यात समावेश करण्यात यावा. भीमाशंकर येथील विकासकामे उत्तम दर्जाची करावीत. विभागातील सर्व धार्मिक स्थळाच्या ठिकाणी भाविकांना अडचण येणार नाही असेच विकासाचे नियोजन व्हावे. पुणे विभागातील सर्व तीर्थस्थळांच्या विकासाबाबत एकत्रित सादरीकरण करण्यात यावे.

सातारा जिल्ह्यातील कास पठार पर्यटन विकास, मेढा – केळघर येथील पुलाचे काम, प्रतापगड परिसर विकास, शिखर – शिंगणापूर विकास आदींबाबत यावेळी आढावा घेण्यात आला. गणेशोत्सव उत्साहाने साजरा होईल यादृष्टीने प्रशासनाने गणेश मंडळांशी समन्वयाने नियोजन करावे. सण – उत्सवाच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था राखली जाईल आणि शांततेत सर्व उत्सव पार पडतील, याविषयी दक्षता घ्यावी, अशाही सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या.

‘हर घर तिरंगा’ अभियान यशस्वी करा

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित ‘हर घर तिरंगा’ अभियान घराघरात पोहचविण्यासाठी सर्व यंत्रणांचा सहभाग घ्यावा. स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधी यांचा सहभाग घेत ‘हर घर तिरंगा’ अभियान यशस्वी करावे. घरावर तिरंगा फडकविण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी बैठकीत पुणे विभागातील विविध विषयांबाबत सादरीकरण केले. विभागात ३१ जुलैपर्यंत सरासरीच्या ८१ टक्के पाऊस झाला आहे. विभागातील मोठ्या प्रकल्पात ७१ टक्के, मध्यम प्रकल्पात ६५ आणि लघू प्रकल्पात ४६ टक्के पाणीसाठा झाला आहे. ४४ तालुक्यातील १५० महसूली मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. नैसर्गिक आपत्तीत मृत पावलेल्या ७ व्यक्तींच्या वारसांना २८ लाख रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे. २ हजार ३१७ हेक्टर क्षेत्रात शेतीपिकांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

बैठकीस माजी मंत्री तानाजी सावंत, माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार दिलीप मोहिते पाटील, माधुरी मिसाळ, संग्राम थोपटे, महेश लांडगे, सुनिल कांबळे, अशोक पवार, चेतन तुपे, सुनील टिंगरे, भीमराव तापकीर, राहूल कुल, सिद्धार्थ शिरोळे, संजय जगताप, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अंकुश शिंदे, विभागातील जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. विभागातील इतर अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीस उपस्थित होते.

प्रारंभी पुणे विभागीय आयुक्त कार्यालय येथे आगमन झाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पुष्पगुच्छ देऊन प्रशासनाच्यावतीने स्वागत केले.

 पोषकतत्वयुक्त आहार वाटपाचा शुभारंभ

पुणे जिल्हा परिषदेंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्यावतीने अंगणवाडी केंद्रातून पोषकतत्वयुक्त आहार अंतर्गत हॉर्लिक्स वाटपाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यासाठी जिल्हा परिषदेने कंपन्यांचे सामाजिक उत्तरदायित्व अंतर्गत हिंदुस्थान युनिलीव्हर सोबत सामंजस्य करार केला असून कंपनी वर्षभर मोफत हॉर्लिक्स पुरवणार आहे. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात बालकांना हॉर्लिक्सचे वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील बालकांच्या आहारामध्ये आवश्यक त्या प्रमाणात सुक्ष्म पोषकतत्वे, जीवनसत्वे आदी पोषक तत्वांचा समावेश व्हावा या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.

कोरोनामुक्त गाव स्पर्धेतील यशस्वी गावांना पुरस्कार

राज्य शासनाने सुरू केलेल्या कोरोनामुक्तगाव स्पर्धा योजनेंतर्गत माण, ता. मुळशी आणि सपकळवाडी, ता. इंदापूर या ग्रामपंचायतींनी कोविड व्यवस्थापनामध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल या गावांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोरोना मुक्त गाव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कोरोनामुक्तीसाठी कुटुंब सर्वेक्षण पथक, विलगीकरण कक्ष, कोरोना तपासणी, कोव्हीड हेल्पलाईन पथक आदींच्या माध्यमातून या गावांनी उत्कृष्ट काम केले आहे.

वेटलिफ्टर हर्षदा गरुडचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

ग्रीस येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविणाऱ्या वडगाव मावळ येथील हर्षदा गरुडचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्कार केला आणि तिला पुढील कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या. हर्षदाने जागतिक ज्युनिअर वेटलिफ्टींग स्पर्धेतील ४५ किलो वजन गटात सुवर्णपदक पटकाविले आहे. या स्पर्धेत भारताला प्रथमच सुवर्ण पदक मिळाले.


Tags: Cm Eknath ShindeMaharashtramumbaiमहाराष्ट्रमुख्यमंत्री एकनाथ शिंदेमुंबईविकासकाम
Previous Post

महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचा हीरक महोत्सव

Next Post

जनतेच्या जीवनात सुख-समृद्धीसाठी मुख्यमंत्र्यांचे खंडोबाच्या चरणी साकडे

Next Post
Pne_dio news CM Jejuri Khandoba Darshan_2 Aug 2022-2

जनतेच्या जीवनात सुख-समृद्धीसाठी मुख्यमंत्र्यांचे खंडोबाच्या चरणी साकडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!