मुक्तपीठ टीम
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्फोट घडवून आणून जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने रविवारी दिवसभर खळबळ माजली. राजकीय वक्तव्य येत असतानाच धमकीचा फोन कोणी केला होता याचा तपास पोलिसांकडून करण्यात आला. त्यातून एक विचित्र माहिती समोर आली आहे. सांगलीतील आटपाडीच्या एका तरुणाने लोणावळ्यातील एका हॉटेल मालकासोबत पाण्याच्या बाटलीच्या किंमतीवरुन वाद झाल्यामुळे अविनाश जाधव या तरुणाने भलताच डाव खेळला. त्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्ला करण्याचा कट रचल्याची खोटी माहिती पोलिसांना दिली. दरम्यान, या आरोपीला पोलिसांनी चौकशी करून सोडून दिले आहे.
काय झालं नेमकं?
- अविनाश आप्पा वाघमारे असं या आरोपीचं नाव आहे.
- रविवारी दुपारी २.४८ वाजण्याच्या सुमारास लोणावळ्यातील जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील साईकृपा हॉटेल येथे अविनाश वाघमारे हा गेला होता.
- आरोपी हा दारूच्या नशेत होता.
- त्याने हॉटेलमधून पाण्याची बाटली विकत घेतली.
- मात्र हॉटेल मालकाने १० रुपयांची बाटली त्याला १५ रुपयांना दिली.
- जास्त किंमत लावणल्याचा राग मनात धरून हॉटेल मनेजर आणि कर्मचाऱ्यांना त्रास देण्याचा उद्देशाने त्याने १०० क्रमांकावर पोलिसांना फोन करून खोटी माहिती दिली.
- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे ठार मारण्याचा प्लॉन चालू आहे, ही खोटी माहिती आरोपीने पोलिसांना दिली.
धमकीमुळे राज्यात एकच खळबळ!!
- यासंबंधीची माहिती मिळताच राज्य सरकार आणि सरकारच्या गृहविभागाने याची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षितेत अधिक वाढ करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला दिले होते.
- तसेच, याप्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेश पोलीस प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांना देण्यात आले होते.
- त्यानुसार, पोलिसांनी त्यांना १०० नंबरवर आलेल्या मोबाईल फोनचे सर्व डिटेल्सची माहिती घेत तपासाची चक्रे फिरवत पोलिसांनी
- अविनाश वाघमारे याला एका बसमधून खेड शिवापूर नजीक ताब्यात घेत अटक केली.
- अविनाश हा मुंबईमध्ये एका कॉल सेंटरमध्ये कामाला आहे. याप्रकरणी त्याच्यावर कलम १७७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- मात्र, त्याला कलम १४९ नुसार सोडण्यात आले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.