Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सगळ्यांना समान न्याय देतील!” – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Rahul narwekar And Eknath SHinde

मुक्तपीठ टीम

विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सगळ्यांना समान न्याय देण्याचा निश्चितच प्रयत्न करतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. विधानसभेच्या विशेष आधिवेशनच्या पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत सरकारच्या वतीने राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी बहुमताने निवड करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत आवाजी मतदानाने मतदान करण्यात आले. सरकारच्या वतीने राहुल नार्वेकर यांना अध्यक्षपदासाठी उमेदवारी देण्यात आली होती. शिवसेना-भाजपचे सर्व सदस्य तसेच सहयोगी पक्षांना राहुल नार्वेकर यांनाच मतदान करण्यासाठी व्हीप बजावण्यात आला होता. त्यानुसार ही सर्व मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत राहुल नार्वेकर यांना १६४ सदस्यांची मतं मिळाल्याने बहुमताने अध्यक्षपदावर निवड करण्यात आली. विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळ यांनी त्यांची निवड झाल्याची घोषणा करताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना त्यांच्या स्थानापर्यंत घेऊन गेले.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी राहुल नार्वेकर हे स्वतः कायद्याचे उत्तम जाणकार आहेत. आधी ते शिवसेनेत होते,आता भाजप मध्ये आहेत, त्याआधी ते राष्ट्रवादी काँग्रेस मध्येही होते. त्यामुळे या सर्व पक्षांना अभिप्रेत असलेल्या भूमिकांची त्यांना उत्तम जाण आहे. पक्षाची हीच भूमिका प्रवक्ते म्हणून मांडताना त्यांनी वेळोवेळी आपल्यातील हे गुण दाखवून दिलेले आहेत. त्यामुळे कोणताही पक्षीय अभिनिवेश न बाळगता ते सदनातील सर्व सदस्यांना निश्चितच समान न्याय देण्याचा प्रयत्न करतील, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.

महाराष्ट्राच्या विधिमंडळाला अनेक उत्तम अध्यक्षांची मोठी परंपरा आहे. कै. ग. वा. माळवणकर यांच्यापासून सुरू झालेली ही परंपरा शेषराव वानखेडे, बाळासाहेब देसाई, अरुण गुजराती, दिलीप वळसे पाटील, हरिभाऊ बागडे आणि नाना पटोले यांच्यापर्यंत आलेली आहे. त्यामुळे या विधिमंडळात कायमच अध्यक्षांना एक वेगळं महत्व आणि मान राहिलेला आहे. तीच धुरा आपल्या खांद्यावर पुढे घेऊन चालण्याची जबाबदारी आता राहुल नार्वेकर यांच्या खांद्यावर आलेली असून ते ती नक्कीच पूर्ण क्षमतेने निभावून नेतील असा विश्वास यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.

आज अध्यक्षपदाची निवडणूक पार पडल्यानंतर उद्या बहुमत चाचणीला देखील सरकारला सामोरे जायचे आहे त्यात देखील हे सरकार निश्चितच यशस्वी होईल असा विश्वास शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.


Tags: AssemblyCm Eknath ShindeMaharashtra Assembly Speaker rahul Narwekarमुख्यमंत्री एकनाथ शिंदेविधानसभाविधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर
Previous Post

शिवसेनेच्या मागणीनुसार मुख्यमंत्र्यांसह बंडखोर आमदारांनी शिवसेना उमेदवाराविरोधात केलेले मतदान रेकॉर्डवर!

Next Post

नव्या अध्यक्षांकडून शिंदे गटाचा शिवसेना विधिमंडळ पक्ष उल्लेख! फडणवीस मागे वळले आणि गोगावले सक्रिय झाले!!

Next Post
Maharashtra Sunday Special Assembly Council

नव्या अध्यक्षांकडून शिंदे गटाचा शिवसेना विधिमंडळ पक्ष उल्लेख! फडणवीस मागे वळले आणि गोगावले सक्रिय झाले!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!