Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोरोना खात्यात शिल्लक आहेत ६०६ कोटी

जमलेल्या निधीपैकी फक्त २५ टक्के निधीच्या वाटपाची अनिल गलगलींची माहिती

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
anil galgali

मुक्तपीठ टीम

कोरोनाच्या काळात मदतीसाठी आवाहन केल्यानंतर मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत कोरोना खात्यात लोकांनी भरभरून आर्थिक सहाय्य केले. आजमितीला ७९९ कोटी जमा झाले असून ६०६ कोटींचा निधी वापराविना शिल्लक असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मुख्यमंत्री सचिवालयाने दिली आहे. १९२ कोटीचे वाटप लक्षात घेता एकूण २५ टक्के रक्कम ही जमा निधीतून खर्च करण्यात आली आहे.

 

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री सचिवालयाकडे एकूण जमा निधी, खर्च करण्यात आलेला निधी आणि शिल्लक निधी याची माहिती विचारली होती. मुख्यमंत्री सचिवालयाच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाने अनिल गलगली यांस कळविले की एकूण ७९८ कोटी रक्कम जमा झाली असून आजमितीस ६०६ कोटी रक्कम शिल्लक आहे. १९२ कोटीचे वाटप केले आहे.

 

अनिल गलगली यांच्या मते हा निधी फक्त कोरोना प्रयोजनासाठी असल्याने आतापर्यंत खर्च शत प्रतिशत करणे आवश्यक होते पण शासनाने २५ टक्के निधीचे वाटप केले आहे. इतका ६०६ कोटींचा निधी राखीव ठेवण्याचे नेमके प्रयोजन काय आहे? याची माहिती जनतेस देण्याची आवश्यकता आहे.

 

जमा रक्कमेपैकी जी रक्कम खर्च करण्यात आली आहे ती १९२ कोटी ७५ लाख ९० हजार १२ रुपये आहे. यात २० कोटी सेंट जॉर्ज रुग्णालयामध्ये कोरोनासाठी विशेष आयसुआय सेटअपसाठी वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत खर्च करण्यात आले. कोविडच्या २५ हजार चाचण्यासाठी ABBOT M2000RT PCR या मशीनच्या कझुमेबल्स विकत घेण्यासाठी ३ कोटी ८२ लाख ५० हजार खर्च करण्यात आले. औरंगाबाद जिल्ह्यातील रेल्वे दुर्घटनेमध्ये मृत झालेल्या मजुरांच्या वारसांना 80 लाखांचे अर्थसहाय्य करण्यात आले. स्थलांतरित मजुरांचे श्रमिक रेल्वे शुल्कासाठी ८२ कोटी ४६ लाख ९४ हजार २३१ रुपये खर्च करण्यात आले. रत्नागिरी आणि जालना जिल्ह्यात कोरोनाच्या चाचण्या करण्यासाठी क्रमशः १ कोटी ७ लाख ६ हजार ९२० रुपये खर्च करण्यात आले.  प्लाझ्मा थेरेपीच्या चाचण्या करण्यासाठी १८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, ४ पालिका वैद्यकीय महाविद्यालय, १ टीएमसी वैद्यकीय महाविद्यालय यांस १६.८५ कोटी रुपये देण्यात आले. माझे कुटुंब आणि माझी जबाबदारी या अभियानासाठी १५ कोटी आयुक्त, राज्य स्वास्थ्य संस्था यांस देण्यात आले. कोरोना साथी दरम्यान देह विक्री करणा-या महिलांना ४९ कोटी ७६ लाख १५ हजार ९४१ रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात आले. कोविड आजारा अंतर्गत म्युटंट मधील व्हेरिएन्टचे संशोधनाकरिता जिनोम सिक्वेसिंग करीता १ कोटी ९१ लाख १६ हजार खर्च करण्यात आले.


Tags: Anil GalgaliCovid Fundअनिल गलगलीमुख्यमंत्री सहाय्यता निधी
Previous Post

राज्यात ७६६ नवे रुग्ण, ९२९ रुग्ण बरे होऊन घरी!

Next Post

तिजोरीत ६०० कोटींचा कोरोना साह्यनिधी, जनता मात्र मदतीपासून वंचितच!

Next Post
keshav upadhye demands release of cm covid fund

तिजोरीत ६०० कोटींचा कोरोना साह्यनिधी, जनता मात्र मदतीपासून वंचितच!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!