Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

प्रभादेवीत राडा: शिंदे गटाच्या आ. सरवणकरांवर गोळीबाराचा आ. सुनिल शिंदेंचा आरोप, सरवणकरांचा इंकार! मनसेकडून खिल्ली!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Shinde group vs shivsena

मुक्तपीठ टीम

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर शिंदे गट विरुद्ध शिवसेना असा वाद विकोपाला गेला आहे. गेल्या काही दिवसांपासून शिंदे गट विरुद्ध शिवसेना वाद हाणामारीवर उतरला आहे. गणपती विसर्जनाच्या दिवशी प्रभादेवीत शिंदे गट आणि शिवसेना भिडल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचाही आरोप आमदार सुनील शिंदे यांनी केला. याबाबत आमदार सदा सरवणकर यांनी मात्र आरोपांचे खंडण केले आहे. दरम्यान, या सगळ्या प्रकरणावरून आता मनसेनं शिवसेनेची खिल्ली उडवली आहे.

नेमकं काय घडलं?

  • गणेश विसर्जनच्या दिवशी प्रभादेवी परिसरात शिवसेनेकडून गणेश भक्तांचे स्वागत करण्यासाठी मंच उभारण्यात आला होता.
  • मात्र, या मंचाच्या शेजारी शिंदे गटानेदेखील आपला मंच उभारला होता.
  • या मंचावरून शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी म्याव म्याव म्हणत शिवसेनेच्या नेत्यांना डिवचले.
  • शिंदे गटातील शाखाप्रमुख संतोष तेलवणे यांना शिवसेना कार्यकर्त्यांनी चोप दिला.
  • यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.
  • अखेर पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद काहीसा कमी झाला.
  • यानंतर आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे.
  • यावरून शिंदे गट विरूद्ध शिवसेना असा वाद पुन्हा पेटण्याची शक्यता आहे.

मनसेने उडवली शिवसेनेची खिल्ली!!

  • या सगळ्या प्रकरणावरून आता मनसेनं शिवसेनेला टोला लगावला आहे.
  • मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर टिका केली आहे.
  • दादर, माहीम, प्रभादेवी हे एक सुसंस्कृत मतदारसंघ आहेत. अशा प्रकारच्या हाणामाऱ्या करायला हे काही बिहार राज्य नाही.
  • पोलिसांनी योग्य ती चौकशी करावी आणि जे दोषी असतील, त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी.
  • शिवसेनेनं जे अडीच वर्षांत पेरलंय, ते आता उगवतंय.
  • तुम्ही अडीच वर्षांत लोकांवर खोट्या केसेस टाकल्या, त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला.
  • माझ्यावर आणि संतोष धुरीवर खोटी केस टाकली की महिला कॉन्स्टेबलला धक्का दिला म्हणून.
  • ती महिला कॉन्स्टेबल आता आहे कुठे? त्यांचं स्टेटमेंट नाही, काही नाही.
  • गेल्या अडीच वर्षांत अशा अनेक खोट्या केसेस तुम्ही लोकांवर टाकल्या.
  • त्यामुळे जे पेरलंय, ते उगवतंय.

Tags: mnsSada SarvankarShinde GroupShivsenaSunil Shindeमनसेशिंदे गटशिवसेनासदा सरवणकरसुनील शिंदे
Previous Post

बाप्पा गेले गावाला, खजिना सोडून आठवणींचा!

Next Post

राहुल गांधींच्या टी शर्टवर नाही, १० लाखांचा सुट, १.५ लाखांचा चष्मा व ८ हजार कोटींचे विमान वापरणाऱ्या फकिर मोदींवर बोला! – नाना पटोले

Next Post
Nana Patole And Pm Modi

राहुल गांधींच्या टी शर्टवर नाही, १० लाखांचा सुट, १.५ लाखांचा चष्मा व ८ हजार कोटींचे विमान वापरणाऱ्या फकिर मोदींवर बोला! - नाना पटोले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!