मुक्तपीठ टीम
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन.व्ही रमणा यांनी शुक्रवारी दिल्लीतील एका कार्यक्रम पोलीस, सीबीआय आणि राजकारण्यांच्या संगनमतावर बोट ठेवलं. आपल्या भाषणात पोलीस यंत्रणेचा उल्लेख करताना त्यात काही सुधारणा करण्याची गरज असल्याचे सांगितले. रमणा म्हणाले की, पोलिसांनी लोकांमध्ये विश्वास निर्माण करणे आवश्यक आहे. यावेळी रमणा यांनी पोलिस आणि राजकारणाच्या संगनमताचाही उल्लेख केला.
राजकीय संगनमताने पोलिसांची प्रतिमा मलिल
- रमणा म्हणाले की, लोक पोलिसांकडे जाण्यास टाळाटाळ करतात.
- भ्रष्टाचार, पोलिसांचा अतिरेक, निःपक्षपातीपणाचा अभाव आणि राजकीय वर्गाशी जवळचे संबंध यामुळे त्याची प्रतिमा मलिल आहे.
- सत्ताबदलानंतर अनेकदा पोलिस अधिकाऱ्यांनी छळ होत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत.
सीबीआयच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित!
- सरन्यायाधीश रमणा यांनी कृती आणि निष्क्रियतेमुळं सीबीआयच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केले जात असल्याचे ते म्हणालेत.
- तपास यंत्रणांना स्वतंत्र, स्वायत्त बनवणे ही काळाची गरज आहे आणि त्यासाठी पहिली पायरी म्हणजे राजकीय आणि कार्यकारी मंडळाशी संबंध तोडणे ही काळाची गरज आहे, असेही त्यांनी सुचवले.
- एनव्ही रमणा यांनी सांगितले की भारतातील पोलीस यंत्रणा ब्रिटिश काळापासून कशी विकसित झाली आणि कालांतराने सीबीआय खोल सार्वजनिक तपासणीत आली.
या बाबींचा परिणाम पोलीस यंत्रणेवर होतोय!
- भारताचे सरन्यायाधीश एनव्ही रमणा म्हणाले की, पोलिसांनी राजकारण्यांशी संबंध तोडले पाहिजेत.
- जनतेचा विश्वास पुन्हा मिळवला पाहिजे आणि नैतिकता आणि अखंडतेसाठी उभे राहिले पाहिजे.
- हे सर्वच संस्थांसाठी आवश्यक आहे.
- त्यांनी पोलिसांच्या समस्यांवरही बोट ठेवले.
- पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळाचा अभाव, सर्वात खालच्या स्तरावर अमानवीय परिस्थिती, आधुनिक उपकरणांचा अभाव, पुरावे मिळवण्याच्या संशयास्पद पद्धती, अधिकारी नियमांचे पालन करण्यात अपयशी ठरणे आणि अधिकाऱ्यांची उत्तरदायित्वाचा अभाव अशा समस्या आहेत, असे ते म्हणाले.
- याचाही परिणाम पोलीस यंत्रणेवर होत आहे.