मुक्तपीठ टीम
भारताचे सरन्यायाधीश एन. व्ही. रामण्णा यांनी विद्यार्थी नेत्यांच्या कमतरतेवर चिंता व्यक्त केली आहे. गुरुवारी ते म्हणाले की, गेल्या ३० वर्षांत एकही मोठा विद्यार्थी नेता उदयास आला नाही, ज्याचा लोकशाहीवर विपरीत परिणाम होत आहे. सरन्यायाधीश एन.व्ही.रामण्णा राजधानी दिल्लीतील राष्ट्रीय कायदा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात उपस्थित लोकांना संबोधित करत होते. यावेळी ते म्हणाले की, भारताच्या अर्थव्यवस्थेच्या शिक्षण विश्वातून एकही मोठा विद्यार्थी नेता पुढे आला नाही. लोकशाहीत विद्यार्थ्यांचा सहभाग काय असावा यावरही चर्चा झाली.
कार्यक्रमाला संबोधित करताना, भारताचे सरन्यायाधीश यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, तुम्ही ज्या जगाचा भाग आहात त्या जगाची जाणीव ठेवा. गेल्या तीन दशकांत शिक्षण विश्वातून कोणताही मोठा नेता उदयास आलेला नाही. सामाजिक कार्यात विद्यार्थ्यांचा सहभाग कमी झाला आहे. त्याचबरोबर त्यांनी आजच्या लोकशाहीसंदर्भात दीक्षांत समारंभात उपस्थित विद्यार्थ्यांना स्पष्टपणे सांगितले की, तुम्हाला एक नेता म्हणून उदयास यायचे आहे, तुमच्यासारखे चांगले, दूरदर्शी, जबाबदार आणि प्रामाणिक विद्यार्थी पुढे येऊन जनतेचे नेतृत्व करणे अत्यंत गरजेचे आहे.
त्याचबरोबर विद्यार्थ्यांची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्यांबाबतही त्यांनी चर्चा केली. ते म्हणाले की विद्यार्थी स्वातंत्र्य, न्याय, समानता आणि नैतिकतेचे रक्षक आहेत, सरन्यायाधीश म्हणाले की, विद्यार्थ्यांनी त्यांची ऊर्जा योग्य ठिकाणी लावली पाहिजे, ज्यातून सर्व गोष्टी साध्य होऊ शकतात. जेव्हा विद्यार्थी सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या सजग असतील, तेव्हाच शिक्षण, अन्न यासारख्या मूलभूत प्रश्नांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागेल. कोणताही सुशिक्षित तरुण समाजातील वास्तवापासून दूर राहू शकत नाही. जेव्हा तुम्ही पदवी घेऊन या संस्था सोडता तेव्हा तुम्ही ज्या जगाचा भाग आहात त्या जगाची नेहमी जाणीव ठेवा.