Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

तुम्हाला कर्ज मिळणार की नाही? व्याज किती? हे सारं ठरवणारा सिबिल स्कोर नेमका काय?

September 6, 2026
in उपयोगी बातम्या, घडलं-बिघडलं
0
CIBIL score

मुक्तपीठ टीम

तुम्ही कर्ज किंवा क्रेडिट कार्ड घेण्यासाठी कोणत्याही बँकेत गेल्यास, बँक किंवा वित्तीय संस्था सर्वात आधी तुमचा सिबिल स्कोर पाहते. बँक किंवा वित्तीय कंपनीकडून किती व्याजावर किती कर्ज मिळेल, ते सिबिल स्कोर किती चांगला आहे यावर अवलंबून आहे.

सिबिल स्कोर हा जितका जास्त असेल तितका कमी व्याजदर आणि कर्ज सहज उपलब्ध होते. सिबिल स्कोर चांगला नसल्यास कर्ज मिळणे कठीण आहे आणि ते महागड्या व्याजानेही मिळेल. सिबिल स्कोरमध्ये सर्व वैयक्तिक माहिती, नोकरीचे डिटेल्स, बँक अकाउंट आणि जुन्या कर्जाचे डिटेल्स असतात. आजकाल विमा कंपन्याही हा स्कोर पाहतात. सिबिल स्कोर ० ते ९०० पर्यंत आहे.

सिबिल स्कोअर चांगला आणि वाईट यांमधील फरक

  • ५५० खूप वाईट
  • ५५०-६५० वाईट
  • ६५०-७५० सरासरी
  • ७५० चांगले
  • ७५०-९०० सर्वोत्तम

व्यावसायिक संस्थांसाठी, सिबिल स्कोर १ ते १० पर्यंत असतो. ०१ हा सर्वोत्तम मानला जातो, तर १० गुण सर्वात वाईट मानला जातात.

कोणतेही कर्ज घेतले नसल्यास, कोणत्याही बँक किंवा एनबीएफसी किंवा फिनटेक कंपनीकडून कर्ज घेतले नसेल तर सिबिल स्कोर शून्याच्या खाली जाईल. तुम्ही वेळेवर कर्जाची नियमित परतफेड केल्यास, सिबिल स्कोर ७५० किंवा त्याहून अधिक असेल.

या चार एजन्सी स्कोअर तयार करतात

  • रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने सिबिल स्कोरशी संबंधित माहिती गोळा करण्यासाठी चार एजन्सींना अधिकृत केले आहे.
  • सिबिल, एक्सपेरियन, इक्विफॅक्स आणि हायमार्क्स या संस्था बँका, एनबीएफसी, फिनटेक कंपन्या अशा विविध स्रोतांकडून कर्ज घेणे, कर्जाची परतफेड करणे यासह माहिती गोळा करतात.
  • यावर आधारित, सिबिल स्कोर तयार केले जातात.
  • कर्ज घेण्यासाठी बँका किंवा वित्तीय संस्थांकडे किती वेळा चौकशी केली हेही संस्था पाहतात.
  • व्यावसायिक संस्थेचे लेखापरीक्षकही न्यायालयात प्रलंबित प्रकरणांसारखी माहिती गोळा करतात.

कर्ज घेताना कोणती काळजी घ्यावी?

  • कर्ज वेळेवर भरणे, हप्ता चुकणार नाही याची योग्य काळजी घ्यावी लागते.
  • कमाईच्या ३० टक्क्यांपेक्षा जास्त कर्ज म्हणून घेऊ नये.
  • कर्जासाठी वारंवार अर्ज करू नका आणि त्यासाठी कोणाला मंजुरी देऊ नका.
  • गरजेनुसार कर्ज घ्या. आकर्षक ऑफर आणि आकर्षक व्याजामुळे कर्ज घेऊ नका.
  • दीर्घ कालावधीसाठी कर्ज घ्या. यामुळे हप्ता देखील कमी होईल, ज्यामुळे पेमेंट सोपे होईल.

Tags: CIBIL scoreCredit cardfinancial institutionloanmuktpeethकर्जक्रेडिट कार्डमुक्तपीठवित्तीय संस्थासिबिल स्कोर
Previous Post

निसर्ग जपला तरच शाश्वत विकास शक्य -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post

आता गरीब कोण? जागतिक बँकेने ठरवली नवी व्याख्या…

Next Post
Poverty

आता गरीब कोण? जागतिक बँकेने ठरवली नवी व्याख्या...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!