Sunday, May 18, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

दिव्यांग कलाकारांच्या स्वरांनी जिंकली पुणेकर रसिक श्रोत्यांची मने

लायन्स क्लबच्यावतीने दिव्यांग विद्यार्थ्यांची समूहगीत स्पर्धा उत्साहात

August 28, 2022
in featured, चांगल्या बातम्या
0
voice of disabled artist

मुक्तपीठ टीम

‘हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे’, ‘झुक झुक आगीन गाडी’, ‘सदैव सैनिका पुढेच जायचे’, ‘लाडक्या गणपती बाप्पांना साकडं’, ‘मनी नाय भाव अन देवा मला पाव’, ‘छडी लागे छम छम’, ‘टप टप थेंब वाजती’, ‘पाऊस आला रे पाऊस आला’, ‘साबुदाणा साबुदाणा, रोज खावा साबुदाणा’, ‘हे भोळ्या शंकरा’ अशी बालगीते, भजन, देशभक्तीपर गाणी, प्रार्थना, अभंग गोड व सुरेल आवाजात गात दिव्यांग विद्यार्थ्यांनी श्रोत्यांची मने जिंकली.

 voice of disabled artist

सर्वसामान्य मुलांप्रमाणे दिव्यांग मुलांना गाता यावे, त्यांना आपल्या सुप्तगुणांना प्रकट करता यावे व त्या माध्यमातून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी लायन्स क्लबच्या वतीने दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी समूहगीत स्पर्धेचे आयोजन केले होते. लायन्स क्लब ऑफ पूना वेस्टतर्फे दरवर्षी या समूहगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यंदाच्या वर्षी स्पर्धेत एकूण १५ शाळा व कार्यशाळा वर्ग सहभागी झाले होते. यावर्षी प्रथमच प्रौढ मतिमंदांचे दोन गट सहभागी झाले होते.

 voice of disabled artist

स्वरबंध या संगीत कार्यक्रमाचे संचालक धनंजय आपटे व कवयित्री अर्चना गौरकर हे या स्पर्धेचे परीक्षक होते. या कार्यक्रमास लायन्स क्लब प्राईमचे माजी प्रांतपाल राजकुमार राठोड, माजी प्रांतपाल आणि ट्वेन्टी फर्स्ट सेंचुरीचे चंद्रहास शेट्टी, झोन चेअरमन पल्लवी देशमुख, स्पर्धा प्रमुख सीमा दाबके, जीवन हेंद्रे, राजेंद्र शेवाळे, पल्लवी लामधडे, मंदाकिनी माळवदे, सतीश राजहंस, राणी अहलुवालिया, सुहास दाबके आणि विद्यार्थी, शिक्षक, पालक उपस्थित होते.

दिव्यांग विद्यार्थ्यांकडून गाण्यासोबतच फलकाच्या माध्यमातून सामाजिक संदेश देखील देण्यात आला. यामध्ये, पर्यावरणपूरक गणेश मूर्ती वापरा, निर्माल्याचा झाडांसाठी खत म्हणून वापर करा, अंधश्रद्धांवर विश्वास ठेवू नका असे प्रबोधनात्मक संदेश स्पर्धकांकडून देण्यात आले. यावेळी सेवासदनच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीवर आधारित विविध पंचवीस गाण्यांचे एकाचवेळी एकत्रितपणे उत्तम सादरीकरण केल्याने उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांना साथ दिली आणि ‘भारत माता की जय’ अशा उत्स्फूर्त घोषणा दिल्या. या गीतासाठी योगेश शिंदे या विद्यार्थ्याने सुंदर तबला वादन केले. त्यासाठी त्याला पाहुण्यांकडून विशेष बक्षीस देण्यात आले. अतिशय सुरेख, लयबध्द पद्धतीने विद्यार्थी विविध गाण्यांचे सादरीकरण करत होते.

 voice of disabled artist

सीमा दाबके म्हणाल्या, “समूहगीत स्पर्धेचे हे बारावे वर्ष आहे. सर्वच शाळांमध्ये संगीताचे शिक्षक असतातच असे नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची अडचण होते मात्र त्यावरही मात करत विद्यार्थ्यांनी छान सादरीकरण केले. स्पर्धेतील सर्वच विद्यार्थ्यानी न डगमगता सुंदर आवाजात गाणी म्हटली. पुढच्या महिन्यात महाभोंडला, समुहनृत्य स्पर्धा, दिवाळी मेळा आणि बालदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. दिव्यांग विध्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि आम्ही पण काही करू शकतो हे सर्वांसमोर आणण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन आम्ही दरवर्षी करतो.”

चंद्रहास शेट्टी, राजकुमार राठोड यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. शाळा गटातून प्रथम क्रमांक सेवासदन दिव्यांग शाळा, कार्यशाळा गटातून माधुरी ओगले आणि पुनर्वसन केंद्र प्रौढ मतिमंदमधून जीवनज्योत या शाळेने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक जीवनज्योत शाळा, तृतीय ब्रम्हदत्त शाळा निगडी, उत्तेजनार्थ साई संस्कार शाळा निगडी आणि कार्यशाळा द्वितीय क्रमांक सेवासदन, दिलासा एरंडवना, तृतीय क्रमांक साई संस्कार निगडी, उत्तेजनार्थ कामयानी गोखलेनगर व गुरुकृपा यांना विभागून देण्यात आले. पुनर्वसन केंद्र प्रौढ मतिमंद द्वितीय क्रमांक नवक्षितिज शाळेला मिळाला. यावेळी सर्व सहभागी विद्यार्थ्यांना लायन्स क्लब ऑफ पूना वेस्ट च्या वतीने वस्तू भेट म्हणून देण्यात आली. प्रतिभा खंडागळे यांनी सूत्रसंचलन केले तर स्मिता देव यांनी उपस्थितांचे आभार मानले.

 

—


Tags: Divyang Students Choir Competitiongood newsLions ClubmuktpeethPunekar passionate listenersvoice of disabled artistचांगली बातमीदिव्यांग कलाकार स्वरदिव्यांग विद्यार्थी समूहगीत स्पर्धापुणेकर रसिक श्रोतेमुक्तपीठलायन्स क्लब
Previous Post

कसाऱ्यात जिजाऊच्यावतीने हृदयविकार तपासणी शिबीर, गरजूंच्या आरोग्य रक्षणाचा उपक्रम

Next Post

भारतीय तटरक्षक दलात नाविक आणि यांत्रिक पदांवर ३०० जागांसाठी संधी

Next Post
indiancoastguard

भारतीय तटरक्षक दलात नाविक आणि यांत्रिक पदांवर ३०० जागांसाठी संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!